Ruchika Jadhav
आचारसंहिता लागू झाल्यानंतर अनेक गोष्टींवर निर्बंध लावले जातात. यात सरकारी आणि नवीन योजना जाहीर करता येत नाही.
आचारसंहिता लागू होताच विविध ठिकाणी उद्घाटन लोकार्पण सोहळे करण्यास बंदी असते. तसेच विविध ठिकाणांचे भूमिपूजन करता येत नाही.
कोणत्याही व्यक्तीच्या दुकानांवर, घरांवर आणि रिकाम्या भिंतींवर राजकीय पक्षाचे झेंडे लावता येत नाहीत.
बॅनर देखील परवानगी असल्याशिवाय लावता येत नाहीत. तसेच सरकारी मालमत्तेचा वापर निवडणूक प्रचारासाठी करता येत नाही.
कोणत्याही पक्षाला सभा किंवा रॅली काढायची असेल तर पोलिसांची परवानगी घ्यावी लागते.
मतदाराला धमकावणे आणि पैसे देणे यावर बंदी आहे.