Maval News : नेमका कुणाचा वरदहस्त? मावळात बेकायदेशीर दारू विक्री पुन्हा सुरू

ड्राय डे असो अथवा काहीही असो तालुक्यात दारूचा महापूर सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
illegal liqour, maval
illegal liqour, mavalsaam tv

Maval News : मावळात बेकायदेशिर दारू विक्री जोमात सुरु आहे. हा प्रकार सुरु असला तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र काेमात असल्याचे दिसून येत आहे. महिलांनी बेकायदा दारू विक्रीविराेधात आंदोलन करूनही दुसऱ्याच दिवशी पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे सुरुच असल्याने बेकायदेशिर दारु विक्रेत्यांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. (Maharashtra News)

illegal liqour, maval
Pankaja Munde At Mahurgad : भाऊला मी सोबत घेऊन आले आहे... आता रेणूका माताच मार्ग दाखवेल : पंकजा मुंडे

मावळ तालुक्यात मुंबई पुणे महामार्ग लगतची हॉटेल धाब्यासह ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये खुलेआम दारू विक्री सुरू आहे. ड्राय डे असो अथवा काहीही असो तालुक्यात दारूचा महापूर सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

illegal liqour, maval
Cidco Officer Held : दहा हजार रुपयांच्या लाच प्रकरणी सिडकोचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

त्यामुळे त्यांच्याच आशीर्वादाने अवैध दारू विक्री सुरू असल्याची चर्चा सध्या मावळात सुरू आहे. शिरगाव मधील पवना नदीच्या लगत असलेल्या गावठी गुत्त्यावर आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने एकाच दारूच्या भट्टीवर चार वेळा कारवाई केली असून अजूनही भट्टी सुरूच आहे.

illegal liqour, maval
Satara News : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणार्‍याला पकडले आहे, मास्टर माईंडचा शाेध सुरू : शंभूराज देसाई

वडगावच्या रेल्वे स्टेशन लगत असलेल्या दारूच्या दुकानावर मोरया प्रतिष्ठानच्या महिलांनी हे दुकान उध्वस्त केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी हे दारूचे दुकान पुन्हा सुरू झाले. त्यामुळे याला कोणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न महिला वर्गाला पडलेला आहे. दरम्यान उत्पादन शुल्क विभागाकडून दारू मुक्त मावळ करण्याचे दावे फाेल ठरत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com