
- सिद्धेश म्हात्रे
Navi Mumbai News : नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात सिडकोचा एक अधिकारी अडकला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली आहे. या कारवाईने सिडकाेत एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)
याबाबत मिळालेली माहिती अशी - सिडकोत प्रशासन विभागात महाव्यवस्थापक पदावर कार्यरत असणाऱ्या जगदीश राठोड या अधिकाऱ्याने इस्टेट एजंट कडून सदनिकेचे फर्स्ट पार्टी डिड ऑफ अपार्टमेंट कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागितली हाेती.
याबाबतची तक्रार एसीबीला प्राप्त झाली. एसीबीने बेलापूर येथील सिडको भवन कार्यालयात सापळा रचला. या सापळ्यात राठाेड अलगद सापडला. त्याला लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले.
या घटनेमुळे सिडको मुख्यालयात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराचे वास्तव आता समोर येत असून सिडको मधील दक्षता विभाग भ्रष्टाचार रोखण्यात निष्क्रिय ठरत असल्याची चर्चा रंगत आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.