IIT च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, परीक्षेच्या आदल्या दिवशी ९ व्या मजल्यावरून मारली उडी

Nagpur IIT Student End Life: नागपूरमध्ये आयआयटीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. वसतिगृहाच्या नवव्या मजल्यावरून उडी मारत त्याने आयुष्या संपवलं. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली. आत्महत्येमागचं कारण समोर आले नाही.
IIT च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, परीक्षेच्या आदल्या दिवशी ९ व्या मजल्यावरून मारली उडी
Nagpur IIT Student End LifeSaam Tv
Published On

Summary -

  • नागपूरमध्ये आयआयटीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली

  • परीक्षेच्या आदल्या दिवशी उचललं टोकाचं पाऊल

  • नागपूर पोलिसांकडून तपास सुरू

  • आत्महत्येमागचं कारण अद्याप समोर आले नाही

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये आयआयटीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीमध्ये हा विद्यार्थी द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. या विद्यार्थ्याने सोमवारी पहाटे वसतिगृहाच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. परीक्षेच्या आदल्या दिवशी या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे नागपूरात खळबळ उडाली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. विद्यार्थ्याच्या आत्महत्येमागचे कारण शोधले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयश चंद्रकांत माने असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव होते. तो मूळचा कोल्हापूरचा होता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षात शिकत होता. सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वसतिगृहाच्या नवव्या माळ्यावरून उडी घेत त्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे नागपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

IIT च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, परीक्षेच्या आदल्या दिवशी ९ व्या मजल्यावरून मारली उडी
Nagpur : अति व्यायामामुळे फाटली मेंदूतील रक्तवाहिनी; गोल्डन अवरमध्ये चमत्कार घडला, डॉक्टरांनी वाचवला तरुणाचा जीव

श्रेयस वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर राहत होता. तो गेल्या काही दिवसांपासून वर्गात नियमित येत नव्हता आणि वर्गातील मित्रांसोबत व्यवस्थीत बोलत नव्हता. आई-वडिलांच्या इच्छेमुळे त्याने आयआयटीला प्रवेश मिळवला होता. हे शिक्षण घेताना तो खूश नव्हता आणि खूपच तणावात होता, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बुट्टीबोरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

IIT च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, परीक्षेच्या आदल्या दिवशी ९ व्या मजल्यावरून मारली उडी
Nagpur : वडील कामावर, आई घरकामात व्यस्त; खेळताना बादलीत पडली, १ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

श्रेयसची सेमीस्टर परीक्षा सुरू होणार होती. याचा अभ्यास झाला नसल्याने तो मागील काही दिवसांपासून तणावात राहत होता अशी माहिती सांगितली जात आहे. वसतिगृहाच्या नवव्या मजल्यावर राहत नसताना देखील तो त्याठिकाणी गेला कसा आणि त्याने तिथून उडी का मारली याबाबत चर्चा होत आहे. या घटनेचा निषेध म्हणून कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी रात्रभर आंदोलन करत निषेध नोंदवला.

IIT च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, परीक्षेच्या आदल्या दिवशी ९ व्या मजल्यावरून मारली उडी
Nagpur : नागपुरात ACBची मोठी कारवाई! बड्या अधिकाऱ्याला ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा अडकला जाळ्यात

आत्महत्या केलेल्या श्रेयसचा मोबाईल अनलॉक झाल्यानंतर त्याच्या आत्महत्येमागचे खरे कारण समजू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या घटनेची माहिती श्रेयसच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ नागपूर गाठले. मुलाने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे श्रेयसच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. पोलिस सध्या या घटनेचा कसून तपास करत आहेत.

IIT च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, परीक्षेच्या आदल्या दिवशी ९ व्या मजल्यावरून मारली उडी
Nagpur Heatstroke: महाराष्ट्रात उष्णतेची जीवघेणी लाट, नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com