Nashik Robbery : ICICI होम फायनान्सच्या लॉकरवरच डल्ला; ५ कोटींचे दागिने लंपास, CCTV

Nashik Bank Robbery News : नाशिकमध्ये आयसीआयसीआय होम फायनान्स बँकेच्या शाखेत चोरी झाल्याची घटना घडली आहे. नाशिकमधील जुना गंगापूर नाका येथे असलेल्या बँकेच्या शाखेत चोरी झाली आहे.
Nashik Bank Robbery
Nashik Bank Robbery Saam tv

नाशिक : नाशिकमध्ये आयसीआयसीआय होम फायनान्स बँकेच्या शाखेत चोरी झाल्याची घटना घडली आहे. नाशिकमधील जुना गंगापूर नाका येथे असलेल्या बँकेच्या शाखेत चोरी झाली आहे. चोरट्यांनी शाखेच्या लॉकरमधील ग्राहकांच्या ५ किमतीच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील आयसीआयसीआय होम फायनान्स शाखेच्या कार्यालयातील लॉकरमधील दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही चोरी झाल्याची घटना घडली. २२२ ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या चोरीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Nashik Bank Robbery
Jalgaon Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला झोपेतच संपविले; आरोपी पती ताब्यात

नेमकी कशी झाली चोरी?

आयसीआयसीआय होम फायनान्स शाखेच्या व्यवस्थापक कार्यालयाची खिडकी उघडून दोन चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. कार्यालयातील सेप्टी लॉकरच्या चाव्या घेऊन सेफ्टी लॉकर उघडला. त्यानंतर त्यांनी १३,३८५.५३ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून पळ काढला. या घटनेने बँकेच्या खातेदारांमध्ये भीती पसरली आहे.

Nashik Bank Robbery
Madhya Pradesh Crime: वाळू माफियांनी पोलीस अधिकाऱ्याला ट्रॅक्टरने चिरडलं, परिसरात दहशतीचं वातावरण

या दोघांनी ओळख पटू नये, यासाठी कोरोना काळात वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाला सेफ्टी सूटचा वापर केला होता. या दोघांपैकी एकाने पांढऱ्या रंगाचा कोरोना सेफ्टी सूटचा वापर केला होता. तर दुसऱ्या चोरट्याने पांढरा रंगाची टोपी आणि मास्क घातला असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. माहितीगार व्यक्तींनी चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com