Ichalkaranji Case: इचलकरंजीत संतापजनक घटना, पुरुष सुरक्षारक्षकावर लैंगिक अत्याचार आणि मारहाण

Ichalkaranji Crime News: इचलकरंजीच्या कोरोचीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका सुरक्षारक्षकाला मारहाण करून लैगिंक अत्याचार करण्यात आलं असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडली आहे.
Ichalkaranji Crime News
Ichalkaranji Crime NewsSaam Tv
Published On

इचलकरंजीच्या कोरोचीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका सुरक्षारक्षकाला मारहाण करून लैगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित व्यक्तीचे वय ५२ वर्ष आहे. आरोपीनं आधी मारहाण केली आणि नंतर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

कोरोचीत खळबळजनक घटना घडली आहे. कोरोचीच्या पाण्याच्या टाकीजवळ एका ५२ वर्षीय व्यक्तीवर लैगिंक अत्याचाराचा प्रकार घडलाय. पीडित व्यक्ती आणि आरोपी हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून, पीडित व्यक्ती सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पत्राच्या शेडमध्ये पीडित व्यक्ती एकटेच होते. हीच संधी साधत आरोपीनं पीडित व्यक्तीला मारहाण केली. नंतर त्यांच्यावर अमानवी लैगिंक अत्याचार केला.

Ichalkaranji Crime News
Kolhapur News : नदीत पोहायला गेले, पुन्हा परतलेच नाही; कोल्हापुरात चित्री नदीत बुडून तिघांचा बुडून मृत्यू

खळबळजनक घटना घ़डल्यानंतर पीडित व्यक्तीनं सगळी माहिती परिसरातील नागरीकांना सांगितली. त्यानंतर परिसरातील नागरीकांनी आरोपीला बेदम चोप देत रोष व्यक्त केला. पीडित व्यक्तीला आरोपीकडून मारहाण आणि नागरीकांनी आरोपीला दिलेला चोप, यामुळे दोघांनाही दुखापत झाली. यानंतर तातडीनं दोघांनाही इचलकरंजी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Ichalkaranji Crime News
Kolhapur Travel : नवीन वर्षात घ्या जंगल सफारीचा आनंद, महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाण

मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास पीडित व्यक्तीची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना कोल्हापूरातील जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणानंतर सीपीआर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे. याप्रकरणानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com