भारत नागणे, साम टीव्ही, प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते हे पुन्हा एकदा माळशिरसच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्या नंतर भाजप आमदार राम सातपुते यांनी माळशिरस येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.
त्यामध्ये त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आणि शरिरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत माळशिरसच्या मातीत गाडून घेईन. माझे अंत्यसंस्कार हे माळशिरस तालुक्याच्या मातीतच होतील अशी भावनिक साद ही त्यांनी घातली. याच वेळी त्यांनी मोहिते पाटील यांच्यावर टिका ही केली.
लोकसभा निवडणुकीत माळशिरस विधानसभा मतदार संघातून एक लाख 80 हजारांचे मताधिक्य मिळवून दाखवू अशी गर्जना करणार्या मोहिते पाटलांना माळशिरस तालुक्यातून 80 हजाराचे ही मताधिक्य मिळवता आले नाही, अशी टिका करत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना डिवचले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते असा संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.
आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत आज माळशिरस येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यातून आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना आव्हान देत मी कुठे ही जाणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत माळशिरस तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी मी स्वतः मातीत गाडून घेईन, असे सांगत आगामी विधानसभेसाठी मोहिते पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.
लोकसभा निवडणुकीत मला विरोधकांनी हिणवले,माझं पार्सल बीडला पाठवण्यास सांगितले. माझावर खालच्या पातळीवर टिका केली. परंतु मी माझे संस्काराची पातळी सोडली नाही. मागील पाच वर्षे साल गडी म्हणून मी काम केले. तुम्ही मला पार्सल म्हणून पाठवण्याचा प्रयत्न केला तरी मी माझा शेवटच्या श्वासापर्यंत आणि शरिरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत माळशिरसच्या जनतेची सेवा करीन. मी मेल्यानंतर माझे अंत्यसंस्कार हे देखील माळशिरस तालुक्याच्या मातीत होतील, असे ही आमदार सातपुते यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.