संतापजनक! आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीची पतीकडून हत्या

चारित्र्याच्या संशयावरून आठ महिन्याची गर्भवती महिलेची पतीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
pune crime news
pune crime news saam tv
Published On: 

नंदुरबार : चारित्र्याच्या संशयावरून आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीची पतीने दोरीने गळफास लावून हत्या केल्याची संतापजनक घटना नंदुरबारमध्ये घडली आहे. नवापूर तालुक्यातील श्रावणी गावात भाड्याच्या घरात राहणारे आणि मूळचे अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तालुका नांदगाव खंडेश्वर गाव रोहना येथील पती अनिल गुलाब तांबे वय ३० व पत्नी वंदना गुलाब तांबे वय २२ असं या प्रकरणातील पती-पत्नींची नावं आहेत.

हे दोघे पती-पत्नी स्टोव्ह, कुकर, गॅस रिपेरिंगचा व्यवसाय करतात. कामानिमित्त हे दोघे नवापूर तालुक्यातील श्रावणी गावात वास्तव्यास होते. यावेळी चारित्र्याच्या संशयावरून आठ महिन्याची गर्भवती असलेल्या पत्नीला दोरीने गळफास लावून पती अनिल तांबे याने पत्नीची हत्या केली.

pune crime news
Crime News | नागपुरात खळबळ! शहरात व्यक्तीची धारदार शस्त्राने दिवसाढवळ्या हत्या

श्रावणी गावातील रहिवासी श्रावण बिजलाल कोकणी यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलिसांनी (Visarwadi Police) मयताचा पती अनिल गुलाब तांबे याला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस (Police) निरीक्षक नितीन पाटील हे करीत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.