सांगली : येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मुलगा होत नसल्याने पतीने गर्भवती पत्नीचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्नी मृतावस्थेत असल्याचे समजून तिला डोंगरात फेकून दिले. या धक्कादायक घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सांगलीच्या आटपाडीच्या काळेवाडी येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडितेने पतीसह दोन जणांविरोधात आटपाडी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Sangli latest crime update)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पदीमनी यांचा प्रेमलतासोबत विवाह झाला असून या दाम्पत्याला दोन मुली आहेत. पण पदमीनी याला मुलगा हवा होता. त्यानंतर गर्भवती पत्नीला गर्भात मुलगा आहे की मुलगी आहे, याची तपासणी करण्यासाठी मुंबईतून साताऱ्यात आणले होते. त्यानंतर पीडितेला संपत मामा व्यक्तीच्या कारमधून आटपाडीकडे घेऊन जात असताना तिचा गळा दोरीने आवळला.
त्यानंतर पीडित महिला बेशुद्ध झाली. पत्नी मृत झाल्याचे समजून पतीने प्रेमलताला बेशुद्ध अवस्थेत आटपाडी तालुक्यातल्या कोळीवाडी येथील चिंचघाट डोंगरात फेकून दिले. काही वेळानंतर पीडित महिलेला शुद्ध आली. त्यानंतर तिने गावात जाऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. या घटनेबाबत पोलिसांना कळताच घटनास्थळी धाव घेत प्रेमलताला पोलिसांनी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. याप्रकरणी पतीसह दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.