Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात; १ जण जागीच ठार

Accident News : समृद्धी महामार्गावर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे समृ्द्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg AccidentSaam Tv

Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी महामार्गावर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे समृ्द्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाल्यापासून या महामार्गावर भिषण अपघाताच्या मालिका सुरूच आहे. (Latest Marathi News)

आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून या दुर्देवी अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल ते माळीवाडा दरम्यान हा अपघात झाला आहे.

Samruddhi Mahamarg Accident
Heart Attack : मनगटावरील 'घड्याळ' देणार हार्ट अटॅकचा 'अलार्म'; 230 रुग्णांवर यशस्वी प्रयोग

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल ते माळीवाडा दरम्यान समृद्धीवर एका ट्रकने दुसऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात ट्रकमधील एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) कांदा घेऊन जात होता, त्यावेळी हा भीषण अपघात झाला. (Accident News)

अपघातामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला होता. बघ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात जमली होती. दोन्हीही ट्रकला क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले असून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

Samruddhi Mahamarg Accident
BJP MLA T Raja Singh : शिवजयंती उत्सवातील विधानावरुन भाजप आमदारावर नगरला गुन्हा

दरम्यान, या आधी देखील समृद्धीवर अनेक भीषण अपघात झाले असून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या कारणाने झालेले अपघात आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सक्रिय झाला आहे आणि अपघात होऊच नये म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com