Nashik Bus Accident: अपघाताचा थरारक Video आला समोर; संपूर्ण बस खाक, उरले फक्त सांगाडे

Nashik Bus Accident: अपघात झाल्यानंतर काही मिनिटांतच बस जळून खाक झाली आणि आत अडकलेले प्रवासी जिवंत होरपळून मृत्यूमुखी पडले.
Nashik Bus Acciden
Nashik Bus Accidenअभिजीत सोनावणे
Published On

नाशिक: नाशिकमध्ये (Nashik) ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला झालेल्या भीषण अपघातात (Accident) ११ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता या दुर्देवी घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. अपघात झाल्यानंतर काही मिनिटांतच बस जळून खाक झाली आणि आत अडकलेले प्रवासी जिवंत होरपळून मृत्यूमुखी पडले. याचे थरारक व्हिडिओ आता समोर आले आहेत. (Nashik Bus Accident Video)

पाहा व्हिडिओ -

नाशिकमध्ये पहाटे सव्वापाच वाजचा एका लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसला भयंकर आग लागली आणि यात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस होती. यवतमाळच्या पुसदकडून मुंबईकडे ही बस जात होती. (Nashik Accident News)

ही लक्झरी बस दुमजली होती. अपघात झाला तेव्हा बसमधील डिझेलच्या टाकीने पेट घेतला. आग लागल्याने प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण आग वाढल्याने जे प्रवाशी बसच्यया वरच्या मजल्यावर होते त्यांना बाहेर पडता आले नाही. या अपघातात अनेक जण जिवंत जळाले आहेत, त्यांचा आता फक्त सांगाडा उरला आहे.

काही प्रत्यक्षदर्शींनी अशीही माहिती दिली की, मृतदेह नेण्यासाठीही रुग्णवाहिका नव्हत्या, त्यामुळे सिटी बसमधून या अपघातामध्ये जिवंत जळालेल्यांचे मृतदेह नेण्याची वेळ ओढावली. बसमध्ये किमान 50 प्रवासी होते. त्यातील 25 प्रवाशांना आम्ही जळताना पाहिलं, असंही काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय. अग्निशमन दल हाकेच्या अंतरावर असूनही वेळेत मदत पोहोचू शकली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर

या घटनेची माहीती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमींवर तात्काळ उपचार देण्याचे आदेश दिले आहेत, तसेच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे. सोबतच या भीषण अपघाताच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com