Raigad Rain News : सावित्री, गांधारी, काळ नदीने ओलांडली धोक्याची पातळी; रायगड जिल्ह्यात NDRF चे विशेष पथक दाखल (पाहा व्हिडिओ)

नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
mahad rain, raigad
mahad rain, raigadsaam tv

- सचिन कदम

Raigad News : रायगड जिल्ह्यातील महाड येथे पुरसदृष्य परीस्थिती निर्माण झाली आहे. सावित्री, गांधारी आणि काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहरातील सकल भागात पुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान पाणी वाढण्याचा जोर कमी असल्याने जनजीवन सामन्य असले तरी प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  (Maharashtra News)

mahad rain, raigad
Amravati News : झोपडपट्टी परिसरातील अनिरुद्धची शिक्षणाची आस, ब्रिटिश सरकारची दीड कोटीची फेलोशिप

रायगड जिल्ह्यात गेले तीन दिवस संततधार पाऊस पडत आहे. दक्षिण रायगडात माणगाव , म्हसळा, श्रीवर्धन, रोहा या तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. महाड, पोलादपुर तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे कोलाड, रोहा, नागोठणे, पाली पसरीसरातुन वाहणाऱ्या कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.

mahad rain, raigad
Sambhaji Brigade News : संभाजी भिडेंच्या आजच्या व्याख्यानास विराेध, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पाेलिसांच्या ताब्यात

NDRF चे विशेष पथक दाखल

पावसाळ्यात (rain) रायगड जिल्ह्यात आप्पतीजनक परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा मुकाबला करण्यासाठी NDRF चे विशेष पथक महाडमध्ये नुकतेच दाखल झाले आहे. जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यात दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन तर महाडमधील पुर परीस्थितीचा विचार करून NDRF चे हे पथक महाड येथे सज्ज ठेवण्यात आले आहे. एक इंस्पेक्टर 24 जवान आणि पीटर नावाच्या श्वानाचा या पथकामध्ये समावेश आहे अशी माहिती इंस्पेक्टर सुजितकुमार पासवान यांनी दिली.

mahad rain, raigad
Potholes Issue : मृत्यूच्या दाढेतून प्रवास... मावळात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, पीडब्ल्यूडी ठेकेदार पाेसताहेत?

पावसामुळे काय घडलं

महाड तालुक्यातील गोठे गावात मंगळवारी घर कोसळलं. संपुर्ण घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घर मालक चंद्रकांत मांजरेकर सुदैवाने बचावले आहेत. महसुल विभागामार्फत घराच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम पुर्ण करण्यात आले.

० महाडमध्ये पुरपरीस्थितीत वाढ.

० शाळा महाविद्यालयांना सुट्टी.

० महाड शहरातील बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी.

पावसाची संततधार कायम

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज (बुधवार) सुट्टी जाहीर केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com