
Indian Railway : मध्य रेल्वेने या सणासुदीच्या/होळीच्या सणात बिहार येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक अद्भुत भेट दिली आहे. मध्य रेल्वे प्रवाशांना त्यांच्या प्रियजनांसोबत होळी साजरी करता यावी यासाठी देशभरातील विविध ठिकाणी एकूण १८४ विशेष ट्रेन चालवत आहे. यापैकी २६ ट्रेन बिहार येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आहेत. या गाड्यांमध्ये वातानुकूलित विशेष, वातानुकूलित, शयनयान आणि जनरल कोचचे संयोजन असलेल्या ट्रेनचा आणि अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे.
बिहारसाठी २६ ट्रेनमध्ये समाविष्ट:
- मुंबई ते दानापुर ८ फेऱ्या
- पुणे ते दानापुर ८ फेऱ्या
- मुंबई ते समस्तीपुर ४ फेऱ्या
- पुणे येथून मालदा शहर २ फेऱ्या
- मुंबई ते रक्सौल आणखी २ फेऱ्या
- मुंबई ते सहरसा २ फेऱ्या
मध्य रेल्वेच्या या विशेष गाड्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत करतील. तसेच प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ केली आहे आणि त्यांच्या नेटवर्कमध्ये अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी विविध स्थानकांवर पुरेशा संख्येने तिकीट काउंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुख्य स्थानकांवर पिण्याचे पाणी, अन्न आणि शौचालय सुविधा असलेली होल्डिंग एरिया तयार केली जात आहेत.
विशेष गाड्यांमध्ये सुरळीत चढण्यासाठी अतिरिक्त रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कर्मचारी आणि तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करून एक पद्धतशीर रांगेची व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली आहे. स्थानकांवर प्रमुख ठिकाणी रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची उपस्थिती प्रवाशांची सुरक्षितता राखण्यास मदत करते. हे कर्मचारी प्रवाशांना त्यांच्या नियुक्त केलेल्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जाण्यास मदत करत आहेत, सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत आणि स्थानक परिसरात गर्दीच्या हालचाली प्रभावीपणे व्यवस्थापित करत आहेत.
रक्सौल आणि सहरसासाठी होळी विशेष गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-रक्सौल होळी विशेष (२ फेऱ्या)
05558 विशेष ट्रेन दि. २०.०३.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सकाळी ७.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.५० वाजता रक्सौल येथे पोहोचेल.
05557 विशेष ट्रेन दि. १८.०३.२०२५ रोजी रक्सौल येथून १९.१५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०५.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: कल्याण, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पंडित दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, पाटलीपुत्र, हाजीपुर, मजफ्फरपुर, सीतामढी आणि बैरगनिया
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-सहरसा होळी विशेष (२ फेऱ्या)
05586 ही विशेष ट्रेन दि. २३.०३.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १६.३५ वाजता सुटेल आणि सहरसा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ९.०० वाजता पोहोचेल.
05585 ही विशेष ट्रेन दि. २१.०३.२०२५ रोजी सहारसा येथून १७.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता पोहोचेल.
थांबे: कल्याण, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, प्रयागराज छिवलक, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, दानापुर, पाटलीपुत्र, हाजीपुर, मुजफ्फरपुर, समस्तीपुर, हसनपुर रोड, खगडिया, मानकर आणि सिमरी भक्तियारपुर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.