Hit And Run Case : वाहनांचा वेग बेततोय जीवावर! आज पुन्हा तीन हिट अॅण्ड रन प्रकरणे: दोन ठार तर ३ महिन्यांची चिमुकली गंभीर जखमी

Hit And Run Case Update : हिंगोलीत मद्यधुंद बोलेरो चालकाने चार जणांना उडवलं असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर नागपूरमध्ये कारचाकाने तीघांना उडवलं. यात ३ महिन्यांची चिमुकली गंभीर जखमी आहे. अकोल्यातही भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
Hit And Run Case
Hit And Run Case Saam Digital

वाहनांचा वेग इतका वाढला आहे की आता हा वेग जिवावर बेतत आहे. पुण्यातील हिट अॅण्ड रन प्रकरण गाजत असताना आज पुन्हा हिंगोली, नागपूर आणि अकोल्यात भीषण अपघात घडले आहेत. हिंगोलीत मद्यधुंद बोलेरो चालकाने चार जणांना उडवलं असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर नागपूरमध्ये कारचाकाने तीघांना उडवलं. यात ३ महिन्यांची चिमुकली गंभीर जखमी आहे. अकोल्यातही भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

हिंगोलीच्या वसमत शहरालगत असलेल्या कारखाना रोड परिसरात मद्यधुंद पिकप चालकाने रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारासह चार जणांना चिरडले आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर ; चार जण गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे . दरम्यान अपघाताच्या घटनेनंतर पिकप चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला आहे. माधव मुंजाजी क्षीरसागर असं मृत तरुणाचं नाव आहे. परिसरातील नागरिकांनी तातडीने आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे

नागपूरमधील अपघातात आई मुलासह ३ महिन्यांची चिमुकली गंभीर जखमी

नागपूर शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ कारचालक तरुणाने तीन लोकांना उडवलं आहे. कारचालक आणि त्याचे इतर दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते. कारमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. या अपघातात आई, मुलगा आणि ३ महिन्याची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी वरून एकाला घेण्यात आलं होतं. त्यानंतर फरार झालेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Hit And Run Case
Ahmednagar News: प्रवरा नदीत बुडून पुन्हा २ तरुणांचा मृत्यू, काल ६ जणांनी गमावला जीव

अकोल्यात भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

अकोल्यात भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झालाय. अकोला जिल्ह्यातील अकोट अंजनगाव रस्त्यावर असलेल्या पठार नाल्याजवळ आज रात्री 9 वाजताच्या सुमारास ही आपघाताची घटना घडलीये. अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकी स्वाराला आपला जिव गमवावा लागला आहे. विलास सोळंके असं या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी अधिक तपास अकोट ग्रामीण पोलीस करतायत. विशेष म्हणजे 25 तासात अकोल्यातली अपघाताची ही तिसरी घटना समोर आली आहे. या तिन्ही अपघातात आतापर्यंत 4 लोकांना आपला जिव गमवावा लागलाय. यामध्ये दोन चिमुकल्यांचाही मृत्यू झाला होता. तर पाच जण गंभीर स्वरुपात जखमी झाले होते

Hit And Run Case
Chhattisgarh Naxalites Encounter: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चकमक, ८०० जवानांकडून ऑपरेशन; ८ नक्षलवाद्यांचा खात्म करण्यात यश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com