Hingoli Viral Video : हिंगोलीत ठाकरे गटाच्या नेत्याकडून बाजार समितीच्या सभापतीला मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hingoli politician fight Viral Video : हिंगोलीत सेनगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंगोलीतील राजकीय लोकांच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हिंगोलीत ठाकरे गटाच्या नेत्याकडून बाजार समितीच्या सभापतीला मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Hingoli Viral Video Saam tv

हिंगोली : हिंगोलीत सेनगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी ही मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीच्या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हिंगोलीत ठाकरे गटाच्या नेत्याकडून बाजार समितीच्या सभापतीला मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Hingoli News: वय उलटूनही लग्न जमेना, नैराश्यातून तरुणाने संपवलं जीवन; हिंगोलीतील धक्कादायक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या सेनगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि भाजप नेते अशोक ठेंगल यांना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी ही मारहाण केली आहे. या व्हिडिओमध्ये ठाकरे गटाचे संदेश देशमुख यांच्यासह दहा ते बारा जणांनी मारहाण केल्याचे दिसून येत आहे. आर्थिक व्यवहारातून मारहाण केल्याची माहिती मिळत आहे.

घटनेनंतर पोलिसांची मोठी कारवाई

मारहाणीच्या घटनेनंतर बाजार समितचे सभापती अशोक ठेंगल यांनी तक्रारी दिली. त्यानंतर ठेंगल यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

तसेच भाजप नेते अशोक ठेंगल यांच्याविरोधात देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बाजार समितीचे संचालक वैभव देशमुख यांच्या तक्रारीवरून सभापती अशोक ठेंगल यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. अशोक ठेंगल यांच्या विरोधात अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हिंगोलीत ठाकरे गटाच्या नेत्याकडून बाजार समितीच्या सभापतीला मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Hingoli Water Crisis : दुष्काळाची दाहकता वाढली; हिंगोली जिल्ह्यात ५१ तलाव कोरडे ठाक

मारहाणीच्या घटनेची सर्वत्र चर्चा

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते, कधी या बाजार समितीमध्ये शेतकरी दरवाढीवरून गोंधळ घालतात. तर कधी बाजार समिती प्रशासन व्यापाऱ्यांची अडवणूक करते. आता तर शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या बाजार समिती सभापती व संचालकामध्येच आर्थिक देवाण-घेवाणीवरून प्रचंड राडा व मारहाणीची घटना घडली. यामुळे सेनगावच्या शेतकऱ्यांचा वाली कोण, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com