Hingoli Rain News: हिंगोलीत पावसाचे रौद्ररुप... ओढ्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेली; सालगड्यासह दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू

Hingoli Rain News: मुसळधार पावसाने आलेल्या ओढ्याच्या पूरात बैलगाडीसह सालगडी वाहून गेल्याची घटना घडली.
Hingoli Rain News
Hingoli Rain NewsSaamtv
Published On

Hingoli Rain Updates:

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. वाढत्या पावसाने अनेक ठिकाणी दुर्घटनाही समोर येत आहेत. हिंगोली जिल्ह्यात ओढ्याच्या पुरात बैलगाडीसह एकजण वाहून गेल्याची घटना घडली.

Hingoli Rain News
Sambhajinagar Adarsh Scam : 'आदर्श' चे अध्यक्ष अंबादास मानकापेसह संचालक मंडळावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंगोलीच्या (Hingoli) कळमनुरी तालुक्यातील सालेगाव शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या मुसळधार पावसाने आलेल्या ओढ्याच्या पूरात बैलगाडीसह सालगडी वाहून गेल्याची घटना घडली.

सालगडी असलेले भीमराव धुळे यांच्यासह दोन बैल व दोन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नेहमीप्रमाणे भीमराव धुळे शेतातील दैनंदिन कामकाज आटोपून गावाकडे निघाले होते. यावेळी ओढ्यातून जात असताना ते बैलगाडीसह वाहून गेले.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहून गेलेल्या भीमराव धुळे यांचा मृतदेह बाहेर काढला. या दुर्देवी प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Hingoli Rain News
Parbhani News: पाऊस ठरला वैरी! मुसळधार पावसात वीज कोसळून तिघांचा मृत्यू,परभणीतील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com