संदीप नागरे, हिंगोली
राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे रण आतापासूनच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्ष प्रवेशांचे सोहळे होत आहेत. हिंगोलीत शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
या दोन्ही पक्षांतून दोनशेहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
देशात पुढील वर्षी लोकसभा निवडणुका (Loksabha Elections 2024) होऊ घातल्या आहेत. तसेच राज्यातही विधानसभा निवडणुकांचे रण तापले आहे. महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.
शिंदे गट आणि ठाकरे गट, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सध्या नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे जोरदार इनकमिंग-आउटगोइंग सुरू आहे. सध्या राज्यात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश सोहळे होत आहेत. हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आणि काँग्रेसलाही जोरदार धक्का दिला आहे.
ठाकरे गट आणि काँग्रेसमधून जवळपास अडीचशे कार्यकर्ते शिंदे गटात आले आहेत. त्यांचा नुकताच पक्षप्रवेश सोहळा झालाय. कळमनुरी तालुक्यातील मोठी आणि महत्त्वाची गावे असलेल्या पिंपळदरी, सोनवाडी, राजदरी, जाम गव्हाण, वसई, येडुद गावातील कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे.
पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पंचायत समितीच्या माजी सदस्यांसह अनेक गावांतील विद्यमान सरपंच आदींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. तर हा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.