आधी दुष्काळ आणि आता अवकाळी यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यात डोक्यावर कर्जाचं ओझं यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. परिस्थिती अशी झाली आहे की बँकेकडून घेतलेले पीक कर्ज परतफेड करण्यासाठी अवयव विक्रीला काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
अवयव विक्रीला काढणाऱ्या शेतकऱ्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज भेट घेतली आहे. यावेळी नेत्यांना गावबंदी करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हिंगोलीच्या गोरेगावमध्ये मागील सहा दिवसांपासून या शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात अन्नत्याग आंदोलन सुरू केल आहे.
सरकार या आंदोलनाची दखल घेत नसल्याने हे शेतकरी सरकारच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पोहोचले.
दरम्यान शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतमालाला योग्य भाव मिळत नसेल तर आम्हालाही कडक भूमिका घ्यावी लागेल. मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना ज्या पद्धतीने गावबंदी करण्यात आली होती, त्याच पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुढील काळात असेच आंदोलन करेल, असा इशारा तुपकर यांनी सरकारला दिला आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल तात्काळ सरकारने घेऊन कर्जमाफीची घोषणा अधिवेशनात करावी. असं देखील तुपकर म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.