Hingoli News : अजित पवारांच्या सभेत जोरदार राडा; मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, पोलिसांचा सौम्य लाठीमार, VIDEO

Ajit pawar News : अजित पवारांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला आहे. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर सोम्य लाठीमार केला आहे.
अजित पवारांच्या सभेत जोरदार राडा; मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, पोलिसांचा सौम्य लाठीमार
Hingoli News :Saam tv
Published On

हिंगोली : अजित पवार यांच्या हिंगोलीतील सभेत मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाल्याने सभेत गोंधळ उडाला. यादरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हिंगोलीत सभा होती. सभेच्या ठिकाणी अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच, मराठा आंदोलक मोठ्या संख्येने तिथे पोहोचले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्हाला अजित पवार यांना निवेदन द्यायचे आहे, असे आंदोलकांकडून सांगण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या. त्यामुळे सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता.

अजित पवारांच्या सभेत जोरदार राडा; मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, पोलिसांचा सौम्य लाठीमार
Malvan Fort Rada : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर मनोज जरांगे पाटील जाणार; PM नरेंद्र मोदींचं नाव घेत स्पष्टच बोलले

राष्ट्रवादी काँग्रेसकडून काढण्यात आलेली जनसन्मान यात्रा हिंगोलीच्या वसमतमध्ये पोहोचली. अजित पवार या यात्रेनिमित्त तिथे पोहोचले होते. अजित पवारांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्याठिकाणी उसळली होती. जनसन्मान यात्रेतील गुलाबी बसमध्ये बसलेले अजित पवार बसमधून खाली उतरले आणि उत्साह संचारलेल्या कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वीकारले.

अजित पवारांच्या सभेत जोरदार राडा; मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, पोलिसांचा सौम्य लाठीमार
Ajit Pawar: मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो; अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त

नेमकं काय घडलं?

आगामी विधानसभा निवडणुकीआधी मराठा आंदोलक सर्व राजकीय नेत्यांना भेटून मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देत आहेत. मराठा आंदोलकांनी या आधी सुप्रिया सुळे यांनाही थेट भरसभेत जाऊन निवेदन दिले होते. मराठा आंदोलकांनी शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या देखील भेटीगाठी घेतल्या आहेत.

आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवदेन देण्यासाठी हिंगोलीत पोहोचले. यावेळी अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेनिमित्त सुरु असलेल्या भाषणादरम्यान निवेदन देण्यासाठी मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर सोम्य लाठीमार केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com