Hingoli News: 'कोऱ्या कागदावर सही केली...', धनगर आरक्षणाच्या पाठिब्यांवरुन ठाकरेंच्या खासदाराचे घुमजाव, प्रकरण काय?

MP Nagesh Patil Ashtikar News: सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र आपण दिले नसल्याचा दावा आता खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला आहे.
Hingoli News: 'कोऱ्या कागदावर सही केली..',  धनगर आरक्षणाच्या पाठिब्यांवरुन ठाकरेंच्या खासदाराचे घुमजाव
MP Nagesh Patil Ashtikar News: Saamtv
Published On

हिंगोली, ता. २६ सप्टेंबर

MP Nagesh Patil Controversy: पंढरपूरमध्ये धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोलीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी लेखी पत्र दिले आहे. या पत्रानंतर नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात आदिवासी समाज आक्रमक पवित्रा घेत आष्टीकर यांच्याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला. या आक्रमक पवित्र्यानंतर आता नागेश पाटलांनी २४ तासात घुमजाव केलं आहे.

Hingoli News: 'कोऱ्या कागदावर सही केली..',  धनगर आरक्षणाच्या पाठिब्यांवरुन ठाकरेंच्या खासदाराचे घुमजाव
PM Modi Visit Pune: पुण्यात पावसाचा हाहाकार! पीएम मोदींच्या दौऱ्याला फटका बसण्याची शक्यता, सभेचे ठिकाण बदलणार?

हिंगोली लोकसभेचे शिवसेना ठाकरे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले असून, धनगर बांधवांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा असं देखील या पत्रात म्हटलं आहे. यावरुनच आदिवासी समाज आक्रमक झाला असून हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये आज आदिवासी समाज बांधवांच्या वतीने धनगर आरक्षणाला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनादरम्यान नागेश पाटील आष्टीकर यांचा देखील निषेध करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय आदिवासी पॅंथर संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. अशातच आता नागेश पाटील आष्टीकर यांनी लेखी पत्रावरून 24 तासात घुमजाव केले आहे , सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र आपण दिले नसल्याचा दावा आता खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला आहे.

Hingoli News: 'कोऱ्या कागदावर सही केली..',  धनगर आरक्षणाच्या पाठिब्यांवरुन ठाकरेंच्या खासदाराचे घुमजाव
Kolhapur News: 'मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी शरद पवारांसोबतच्या नात्यांचा सौदा', समरजितसिंह घाटगेंची मुश्रीफांवर जहरी टीका

आपण अनेकदा कोऱ्या कागदांवर सह्या करतो असा अजब दावा अष्टीकर यांनी केला आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र हा विरोधकांचा डाव असल्याचे देखील खासदार अष्टीकर म्हणाले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर पत्र व्हायरल झाल्यानंतर आदिवासी समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी भूमिका बदलल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Hingoli News: 'कोऱ्या कागदावर सही केली..',  धनगर आरक्षणाच्या पाठिब्यांवरुन ठाकरेंच्या खासदाराचे घुमजाव
PM Modi Visit Pune: पावसाचे विघ्न! पीएम मोदींचा पुणे दौरा रद्द

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com