Hingoli Crime : दारू पिऊन पत्नीला त्रास; वादात घडले भयंकर, अंत्यविधीवेळी पत्नीने केलेल्या कृत्याचे फुटले बिंग

Hingoli News : गेल्या तीन दशकांपासून दररोज मद्य प्राशन करून पत्नीला त्रास देणाऱ्या पतीचा अंत झाला आहे. त्रास होत असलेल्या पत्नीनेच पतीची हत्या केल्याची थरारक घटना घडली आहे.
Hingoli Crime
Hingoli CrimeSaam tv
Published On

हिंगोली : दारूचे व्यसन असलेला पती रोज दारू पिऊन घरी यायचा. यानंतर पत्नीला सातत्याने त्रास देत मारहाण देखील करायचा. दरम्यान दारू पिऊन पत्नीला मारहाण करताना असह्य त्रासाला कंटाळून पत्नीने पतीच्या हातातील हत्यार घेत पतीवर वार करत हत्या केली. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नीने पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यात समोर आली आहे. 

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बाभुळगावमध्ये सदरची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या तीन दशकांपासून दररोज मद्य प्राशन करून पत्नीला त्रास देणाऱ्या पतीचा अंत झाला आहे. त्रास होत असलेल्या पत्नीनेच पतीची हत्या केल्याची थरारक घटना घडली आहे. कैलास गलांडे असे घटनेत मृत पतीचे नाव आहे. तर सुमित्रा गलांडे असे हत्या करणाऱ्या संशयित पत्नीचे नाव आहे. दरम्यान पती- पत्नी बाबुळगाव मध्ये कुटुंबासोबत वास्तव्यास होते. 

Hingoli Crime
Amravati Crime : वडिलांनी आणलेली दारू मुलाने पिली; रागाच्या भरात पित्याचे भयानक कृत्य, मुलाचा मृत्यू

मध्यरात्री घडला थरार 

कैलास गलांडे हा दररोज दारू पिऊन पत्नीला त्रास देत मारहाण करायचा. दिवसभर काम धंदा करायचा आणि रात्री घरी येताना सर्व पैसे दारूत घालायचा. कैलासाच्या या दररोजच्या त्रासाला पत्नी सुमित्रा ही ट्रस्ट झाली होती. दरम्यान ३ जूनच्या मध्यरात्री देखील नेहमीप्रमाणे कैलास दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याने घरातील लोखंडी धारदार कत्ती घेत पत्नीवर वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. तर पत्नी सुमित्राने पतीच्या हातातील लोखंडी कत्ती हिसकावून कैलासवरच सपासप वार केले. 

Hingoli Crime
Mumbai Crime : चोरी करण्यासाठी अजब फंडा; चोराची शक्कल पाहून पोलिसही चक्रावले, ४१ लाखांच्या दागिन्यांसह चोरटा ताब्यात

मृतदेह जाळून केला आत्महत्येचा बनाव 

रक्तबंबाळ अवस्थेत कैलास जमिनीवर कोसळला. अचानक घडलेल्या प्रकाराने सुमित्राला घाबरून गेली. तर नवऱ्याला मारल्याची माहिती गावात समजेल या विचारात पत्नी सुमित्राने गाडीमधील पेट्रोल काढत पती कैलासच्या अंगावर ओतून त्याला पेटवून देत आत्महत्या केल्याचे भासवले. गावातील लोकांनी देखील कैलासने दारूच्या नशेत केले असावे, असा समज केला. 

अंत्यविधीच्या वेळी फुटले बिंग 

दरम्यान मृतदेह रुग्णालयात न नेता अंत्यविधी करा असा हट्ट पत्नी सुमित्रा हिने केला. यामुळे ग्रामस्थांना संशय आला. शिवाय अंत्यविधीच्या वेळी कैलासच्या डोक्यावर व शरीरावर कत्तीचे केलेल्या वरचे घाव दिसून आल्याने पत्नीने केलेल्या कृत्याचे बिंग फुटले. या प्रकरणी पोलिसांना माहिती दिल्यानंतर गोरेगाव पोलिसांनी सुमित्रा हिच्या विरोधात गुन्हा दाखल करा अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com