Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर वाशिमजवळ कारला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर
Samruddhi Mahamarg AccidentSaam Tv
Published On

वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कार उलटून झालेल्या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. वाशिम पोलिस या अपघाताचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर वाशिमच्या वनोजा- कारंजादरम्यान चॅनल क्रमांक 215 वर कारला भीषण अपघात झाला. ही कार पुण्यावरून नागपूरच्या उमरेडला जात होती. कारमधील सर्वजण एकाच कुटुंबातील होते. उमरेडला राहणारे जयस्वाल कुटुंबीय नामकरण सोहळ्यासाठी पुण्याला गेले होते. पुण्यावरून परत येत असातना त्यांच्यावर काळाने घाला घातला. नागपूर कॉरिडॉरवर वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारला अपघात झाला. भरधाव कार डिव्हायडरला धडकून महामार्गावर उलटली.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर
Accident: स्विमिंग पूलमध्ये धम्माल, घरी जाताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा जागीच मृत्यू, शेवटचा VIDEO व्हायरल

या अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये वैदीही जयस्वाल, संगीता जयस्वाल, राधेश्याम जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांचा मृत्यू झाला. तर चेतन जयस्वाल गंभीर जखमी झाले आहेत. वाशिम येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर
Accident News: कार ६० फूट खोल ओढ्यात कोसळली, मुंबई-गोवा महामार्गावर थरारक घटना, पाहा,VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com