विनायक वंजारे, साम टीव्ही
सिंधुदुर्ग: येथील मुंबई गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील बांदा बसस्थानाकाजवळील दुसऱ्या पूलावरून एक भरधाव वेगात असलेली कार खाली कोसळली. ही घटना बुधवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात सावंतवाडी येथील चार युवक थोडक्यात वाचले. बांदा पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत सुटका केली. सदर कार पूलापासून सुमारे 100 मीटर मागे डिव्हायडरवर चढली. त्यानंतर एकदम जोरात वेगाने स्ट्रीट लाईटचा खांब तोडून 60 फूल खोल जाऊन कोसळली. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. कारमधील सावंतवाडी येथील चारही युवकांना सुखरूप बाहेर काढले.
याबाबत अधिकची माहिती अशी की, महामार्गांवर भरधाव वेगात ओहोळात कोसळलेल्या कार मधील चारही पर्यटक सुखरूप असून त्यांना रात्रीच बांदा पोलिसांनी शर्थिचे प्रयत्न करत तुडुंब भरून वाहत असलेल्या ओहोळतून बाहेर काढले. बांदा पोलीस कर्मचाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे त्यांचे कौतुक होत आहे. क्रेटा कार मध्यरात्री एकच्या सुमारास ओहोळात कोसळली. या गाडीत चारजण होते. सुदैवाने गाडीचा सनरुफ उघडल्याने हे चारहीजण बचावले. सनरुफ उघडल्याने एकाने बाहेर येत महामार्गांवरुन जाणाऱ्या गाड्यांना मदत कार्यासाठी विनवणी केली. दरम्यान अन्य तिघेजण गाडीच्या टफावर उभे राहून मदतीसाठी आरडाओरड करत होते. दरम्यान गस्ती वर असलेल्या बांदा पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तुडुंब भरलेल्या ओहळातून त्यांना बाहेर काढले.
प्रथम त्यांना लाईफ जॅकेट देत दोरीच्या सह्यायाने बाहेर काढले. यात चारही जण सुखरूप असुन त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. हे वाहन सावंतवाडीहून गोव्याच्या दिशेने जात होते. यावेळी पोलीस कर्मचारी विलास भोगले, राजाराम कापसे, रोहित कांबळे, दाजी परब या पोलीस कर्मचाऱ्यांनी या तिघांचे प्राण वाचवले. या सर्व कर्मचाऱ्यांच्या समयसूचकतेबाबत त्यांचे कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.