Consumer Awareness : नियम पाळले नाहीत, कॅडबरीच्या २५४ बॉक्समध्ये बुरशी; अन्न औषध प्रशासनाची धडक कारवाई

Ahilyanagar News : अहिल्यानगरात अन्न औषध प्रशासनाची धडक कारवाई! चुकीच्या साठवणुकीमुळे कॅडबरी चॉकलेटच्या २५४ बॉक्समध्ये बुरशी आढळली. वितरक व कंपनीला करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
Consumer Awareness : नियम पाळले नाहीत, कॅडबरीच्या २५४ बॉक्समध्ये बुरशी; अन्न औषध प्रशासनाची धडक कारवाई
Ahilyanagar NewsSaam Tv
Published On
Summary
  • अहिल्यानगरात कॅडबरी वितरकावर अन्न औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे.

  • चुकीच्या साठवणुकीमुळे २५४ बॉक्स चॉकलेटमध्ये बुरशी आढळली.

  • अन्न औषध प्रशासनाने कंपनी व वितरकावर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

  • ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना कॅडबरी देत असाल तर सावधान! कॅडबरी / चॉकलेट मुलांना देण्यासारखं आहे का? हे आधी तपासून घ्या. कारण अनेकदा या पॅकेट बंद खाद्य पदार्थांना विकताना दुकानदारांकडून बऱ्याचदा योग्य ती काळजी घेतली जात नाही. त्यामुळे जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. कॅटबरी विकणाऱ्या दुकानदाराने चॉकलेटचा साठा २५ डिग्रीपेक्षा कमी तापमानात ठेवल्याने त्याला बुरशी लागली होती. या दुकानावर अन्न औषध प्रशासनाने धाड टाकत कारवाई केली आहे.

शहरातील धूपर अँड सन्स या कॅटबरी वितरकाच्या दुकानावर अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. छाप्यात विविध प्रकारच्या चॉकलेटचे तब्बल २५४ बॉक्सेस जप्त करण्यात आले आहेत. अन्न औषध प्रशासन अधिकारी राजेश बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅटबरी कंपनीकडून स्टोरेजसंदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले असून चॉकलेटचा साठा २५ डिग्री सेंटीग्रेटपेक्षा कमी तापमानात ठेवणे आवश्यक आहे. मात्र वितरकाने हे नियम पाळले नाहीत. उलट उघड्यावर आणि अस्वच्छ ठिकाणी, भिजलेल्या भिंतीलगत ठेवलेले अनेक बॉक्सेस बुरशी लागलेल्या अवस्थेत आढळून आले.

Consumer Awareness : नियम पाळले नाहीत, कॅडबरीच्या २५४ बॉक्समध्ये बुरशी; अन्न औषध प्रशासनाची धडक कारवाई
Pune Viral Video : भर रस्त्यात तरूणीला लाथा बुक्क्यांनी मारलं, पुण्यात नेमकं चाललंय काय ? व्हिडिओ पाहून राग अनावर येईल

कॅटबरी ब्रँडच्या विविध उत्पादनांमध्ये व्हेजिटेबल ऑइल आणि फॅटचा वापर केला जातो. त्यामुळे स्टोरेज कंडिशनचे पालन न झाल्यास या घटकांचे गुणवत्तेवर परिणाम होतात विशिष्ट तापमानात साठा न ठेवल्यास चॉकलेटमधील व्हेजिटेबल ऑइल आणि फॅट मेल्ड होतात, म्हणजेच खराब होऊन त्याचा दर्जा बिघडतो.

Consumer Awareness : नियम पाळले नाहीत, कॅडबरीच्या २५४ बॉक्समध्ये बुरशी; अन्न औषध प्रशासनाची धडक कारवाई
Dharashiv Farmers : कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, अनुदान थेट खात्यात जमा होणार, शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाचा दिलासा

याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. या गंभीर उल्लंघनामुळे धूपर अँड सन्स या वितरकावर व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली असून कॅटबरी कंपनीलादेखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे अन्न औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com