नागपूर : चीनमध्ये कोरोनाचं थैमान सुरु असताना महाराष्ट्रात खबरदारी बाळकली जात आहे. राज्याच आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी राज्यात मास्क सक्ती करायची की नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असंही तानाजी सावंत यांनी सांगितलं. (Corona Virus)
केंद्र सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्याचे पालन केले जाईल. चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या BF7 व्हेरिएंटचे सध्या चार रुग्ण देशात आहेत. पण महाराष्ट्रात या व्हेरिएंटचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं. (Latest Marathi News)
महाराष्ट्रात तरी या नवीन व्हेरियंटचा रुग्ण आढळला नाही. मात्र आरोग्य विभागा सतर्क आहे. राज्यात लसीकरण, डॉक्टर, औषधे या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. टेस्टिंग, ट्रॅकिंग, लसीकरण या संदर्भात सूचना दिल्या आहेत.
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल टेस्टिंग करण्याच्या सूचना देखील आरोग्य मंत्र्यांनी दिल्या आहेत. विशेषतः चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मास्क घालणे बंधनकारक करायचे की नाही यासंदर्भात मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतनंतर निर्णय घेऊ. राज्यात लसीकरण मोठ्या झाले आहे. महाराष्ट्रातील लोकांची इम्युनिटी चांगली आहे. त्यामुळं घाबरण्याचे कारण नाही, असंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं.
राज्यात पुन्हा टास्क फोर्स
राज्यातील कोविड-19 परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या समन्वयाने एक टास्क फोर्स तयार करेल. जे राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवेल. ही टास्क फोर्स राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत सर्व माहिती सरकारला देईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.