Harshvardhan Patil News : लोकसभेत सुप्रिया सुळे यांना इंदापूरमध्ये मोठा लीड मिळाला होता. सुप्रिया सुळे यांच्या विजयावर आता पक्षात येताच हर्षवर्धन पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे. सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य हात होता, आभार मानण्यासाठी उभा आहे, असं वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये केले. हर्षवर्धन पाटील यांनी आज तुतारी हातात घेतली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच हर्षवर्धन पाटील यांनी भाजपावर टीकेचा केली. (harshvardhan patil sharad pawar)
१० वर्षे सत्ता नसतानाही माणसे जोडली. लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा माणसं मोठी असतात. मी आल्याने काहीजण नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी दूर करु, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. मला कुठलीही जबाबदारी द्या, मी शब्दाचा पक्का आहे, असा विश्वासही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिला.
काही मिळावे म्हणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रसमध्ये प्रवेश घेतला नाही. व्यक्तिगत स्वार्थासाठी मी राजकारण करत नाही, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकट्याचा नाही तर कार्यकर्त्यांचाही प्रवेश झालाय, असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
लोकसभेला सुप्रियाताई सुळे यांच्या निवडणूक निकालात आमचा सहभाग अदृश्य होता. यापूर्वी दोन निवडणुका मी काम केलं, पण या निवडणुकीत मी अदृश्य सहभाग घेतला होता. सगळ्यांनी आग्रह धरला मग आम्ही प्रवेश केला.
मंत्री असताना सगळं असताना लोक सोडून जात आहेत. आमच्याकडे काही नसताना लोक आमच्याबरोबर आहेत. लोकशाहीत पक्षापेक्षा जनता महत्वाची आहे. मी फडणवीस यांना सांगितलं माझी अडचण काय आहे, ते त्यांनी मला त्यांची अडचण सांगितली. मला त्यांनी पर्याय ठेवले, पण जनता त्यापुढं गेली, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.