- सागर निकवडे
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात एकाच वेळी जीएसटी विभागाने विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सिमेंट, लोखंड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे ही छापेमारी करण्यात आली आहे. (Maharashtra News)
जीएसटी विभागाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, अक्कलकुवा, खांडबारा आणि इतर ठिकाणी बांधकाम साहित्याशी संबंधित असलेल्या व्यापारी, व्यावसायिकांच्या दुकानांवर हा छापा टाकण्यात आला आहे.
दरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सध्या तरी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. एकाच वेळी जीएसटी विभागाची तपासणी होत असल्याने बांधकाम व्यवसायिक आणि बांधकाम साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.