Maharashtra Politics: योजनांना कात्री, लाडकीला अभय! महाराष्ट्र सरकार मोफत योजना बंद करणार? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना डोईजड झाल्यानं राज्य सरकारने आता इतर मोफत योजनांना कात्री लावण्याचा घाट घातला आहे. टप्प्याटप्प्यानं सर्व मोफत योजना बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोणत्या योजनांवर गंडांतर येणार आहे पाहूया एक रिपोर्ट
mahayuti
Maharashtra Politics:Saam tv
Published On

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना डोईजड झाल्यानं सरकारला आता काटकसर आठवू लागली आहे. राज्याच्या अर्थ विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. जवळपास 1 लाख कोटींच्या बचतीचं ध्येय अर्थ विभागानं डोळ्यांसमोर ठेवलंय. त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन त्यांना टप्प्याटप्प्यानं कात्री लावण्याचं लक्ष्य अर्थमंत्री अजित पवारांनी ठेवल्य़ाची माहिती सूत्रांनी दिलीय.

राज्याची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती, डोक्यावर असलेलं लाख भर कोटींचं कर्ज...यातून सावरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. मात्र महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आणण्यात 'लाडकी बहीण' योजनेचा सिंहाचा वाटा असल्याने ही योजना बंद होणार नाही. फक्त निकषांनुसार लाभ दिला जाणार आहे.

mahayuti
Eknath Shinde : मराठी माणसाने मराठी माणासाचा सत्कार केल्याने एवढी पोटदुखी का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
mahayuti
Ladki Bahin Yojana: राज्याचा अर्थसंकल्प कधी? लाडक्या बहि‍णींना कधी मिळणार २१०० रुपये? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

राज्यात कुठल्या मोफत योजना सुरू आहेत पाहूयात...

राज्यातील मोफत योजना

शिवभोजन

आनंदाचा शिधा

मुख्यमंत्री शिष्यवृत्ती

पिंक रिक्षा

मागेल त्याला सोलार पॅनल

शेतीसाठी मोफत वीज

mahayuti
Ladki Bahin Yojana : धुळ्यात २० लाडक्या बहिणींनी नाकारला योजनेचा लाभ; १४ हजार महिलांचे अर्ज झाले रद्द

अडीच कोटींच्या घरात लाडकीच्या लाभार्थ्यांची संख्या आहे. त्यामुळे सरकारनं आता बोगस लाभार्थींकडे आपला मोर्चा वळवलाय. त्याशिवाय दोन-दोन सरकारी योजनांचा लाभा घेणाऱ्या पाच लाख लाडकींनाही योजनेतून वगळंल आहे. आता मविआच्या सत्ता काळात लोकप्रिय ठरलेली शिवभोजन योजना, आनंदाचा शिधा योजना बंद करुन पैसे वाचवण्याचा सरकारचा विचार असल्याचं कळतंय. लाडकीमुळे बिघ़डलेलं आर्थिक गणित जुळवण्यासाठी आता गरिबांचा घास तर हिरावला जाणारच आहे मात्र त्यांची दिवाळीही कडू होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com