Eknath Shinde : मराठी माणसाने मराठी माणासाचा सत्कार केल्याने एवढी पोटदुखी का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Eknath Shinde Latest News : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मराठी माणासाचा सत्कार केल्याने एवढी पोटदुखी का? असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे.
eknath shinde News
Eknath ShindeSaam tv
Published On

नाशिक : शरद पवार यांनी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला होता. शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. या सत्कारावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली होती. संजय राऊत यांच्या भूमिकेला उद्धव ठाकरेंनी समर्थन दिलं होतं. संजय राऊत यांच्या टीकेमुळे महायुतीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. आता या वादावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी माणसाने मराठी माणासाचा सत्कार केल्याने एवढी पोटदुखी का? असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांवर टीका केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले. एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे

मला महादजी शिंदे पुरस्कार मिळाला आहे. मला पुरस्कार मिळाल्यानंतर जळफळाट सुरू झाला. पोटदुखी सुरू झाली. शरद पवारांना देखील अपमानित केलं. साहित्यिकांना देखील अपमानित केलं. महादजी शिंदे यांना अपमानित केलं आहे. माझं सोडून द्या पण, एका मराठी माणसाने मराठी माणसाचा सत्कार केला तर एवढी पोटदुखी, एवढा जळतात का? तुम्हाला उठता झोपता, फक्त एकनाथ शिंदे दिसतो.

eknath shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उदारपणा; ज्या कर्जाच्या डोंगरामुळे शिरीष महाराजांनी जीवन संपवलं, ते कर्ज शिंदेंनी फेडलं | Video

मोगलांच्या घोड्याला पाणी पिताना पाण्यात देखील संताजी-धनाजी दिसत होता. तसा यांना एकनाथ शिंदे दिसतो. एवढी पोटदुखी की जातच नाही. कारण, तुम्ही औषध कंपाउंडरकडून घेत आहेत म्हणून तुमची पोटदुखी जात नाही, चांगला डॉक्टर घ्या आणि तुमची पोटदुखी घालवा. बाळासाहेब ठाकरे हा आपला दवाखाना आपण चालू केला आहे. मोफतमध्ये उपचार घ्या

eknath shinde News
Eknath Shinde : शिंदेंना व्यवस्थापन समितीतून वगळलं? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर | Video

मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. राज्याचा मुख्यमंत्री झालो. मी कार्यकर्ता म्हणूनच काम केलं, कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. मी मुख्यमंत्री होतो, लोक म्हणायचे की, मी मुख्यमंत्री म्हणायचो, सीएम म्हणजे कॉमनमॅन.

आता मी मुख्यमंत्री आहे, आता मी म्हणतो की, डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्यांना समर्पित असं काम हा एकनाथ शिंदे करणार. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी या महाराष्ट्रासाठी काम करणार आहे.

eknath shinde News
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; हेलिकॉप्टर हेलीपॅडवर उतरताना ड्रोनच्या घिरट्या,VIDEO

मला काय मिळालं, यापेक्षा राज्यातील जनतेला काय मिळालं. त्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी काय केलं हे विभागणार आहे. येथे देना बँक आहे, समोर देना बँक होती. माझी लाईन पुसण्यापेक्षा तुमची लाईन मोठी करा. तुमची लाईन मोठी करा, एकनाथ शिंदे सारखं काम करा. एकनाथ शिंदे जहा खडा होता है, वहा से लाईन शुरू होती है. ही लाईन जनसेवेची आहे. तुमचे लोक तुम्हाला का सोडतात ते तर बघा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com