Holi Special Train: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर; होळीसाठी धावणार विशेष रेल्वे, जाणून घ्या टाईमटेबल

Holi special Train: होळी येताच उत्तर प्रदेशातील लोक आपापल्या घराकडे जायला लागतात. हे लक्षात घेऊन दूरवर राहणाऱ्या लोकांना त्यांच्या कुटुंबासोबत सण साजरा करता यावा यासाठी विविध राज्यांतून होळी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.
Holi special Train
Holi special TrainYandex
Published On

Holi special Train Mumbai-Delhi, Mumbai-Konkan, Pune-Delhi:

महाशिवरात्री झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये होळीची तयारी सुरू होत असते. होळीचा सण साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात राहणारे उत्तर भारतीय लोक आपल्या राज्यात जात असतात. महाराष्ट्रातही होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुणे-मुंबईत राहणारे कोकणातील चाकरमानी शिमगा साजरा करण्यासाठी घरी जात असतात. ही बाब लक्षात ठेवत रेल्वे विभागाने काही विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केलीय.(Latest News)

कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या असते. ही बाब लक्षात घेत मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केलीय. या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. अहमदाबाद – मडगाव, एलटीटी – थिवी, पनवेल – सावंतवाडी, उधना – मंगळुरू, सुरत – करमळी या होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

असे असेल वेळापत्रक

कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या अहमदाबाद – मडगाव होळी विशेष गाड्या १९ मार्च २०२४ पासून चालविण्यात येतील.

होळी विशेष रेल्वेगाडी - गाडी क्रमांक ०९४१२ अहमदाबाद –मडगाव (वसई रोडमार्गे) १९ आणि २६ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता सुटेल. तर मडगावला दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता पोहोचेल.

होळी विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०९४११ मडगाव –अहमदाबाद होळी विशेष रेल्वेगाडी २० आणि २७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी अहमदाबादला सकाळी ७ वाजता पोहोचेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुठे असतील थांबा -

ही रेल्वेगाडी बडोदा, सुरत, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी आणि करमाळी येथे थांबेल.

एलटीटी - थिविम विशेष रेल्वेगाडी १४, २१ आणि २८ मार्च रोजी सुटेल तर, थिविम-एलटीटी विशेष रेल्वेगाडी १५, २२, २९ मार्च रोजी दुपारी सुटेल. या रेल्वेगाड्या - ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा घेणार आहे.

पनवेल –सावंतवाडी गाडी क्रमांक ०१४४३ विशेष रेल्वे गाडी (साप्ताहिक) पनवेल येथून १३, २० आणि २७ मार्च रोजी सकाळी ९.४० वाजता सुटेल. थांबा - ही गाडी कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि रोहा या स्थानकांवर गाडी थांबेल.

होळी विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०९०५७ उधना –मंगळुरू २० आणि २४ मार्च रोजी रात्री ८ वा. सुटेल. तर गाडी क्रमांक ०९०५८ मंगळुरू–उधना होळी विशेष रेल्वेगाडी २१ आणि २५ मार्च रोजी रात्री १० वाजता सुटेल. गांडी क्रमांक ०९११३ सुरत - करमळी होळी विशेष रेल्वेगाडी २१ आणि २८ मार्च रोजी सायंकाळी सुटेल. तर करमळी-सुरत होळी विशेष रेल्वेगाडी २२ आणि २९ मार्च रोजी सकाळी सोडण्यात येणार आहे.

युपी (उत्तर प्रदेश), दिल्लीसाठी विशेष गाड्या

  • ०१०५२/५४ - लोकमान्य टिळक ते बनारस स्टेशन

  • ०१४०९/१० - लोकमान्य टिळक ते दानापुर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन

  • ०१०४३/४४ - लोकमान्य टिळक ते झ. समस्तीपूर स्टेशन

  • ०१०४४५/४६ - लोकमान्य तिलक ते प्रयागराज स्टेशन

  • ०१०३७/३८ - पुणे ते कानपूर सेंट्रल सुपरफास्ट

  • ०११०३/०४ - छत्रपती शिवाजी महाराज ते गोरखपूर स्टेशन

  • ०११०५ /०६ - पुणे ते दानापूर स्टेशन

  • ०११२३/ २४ - लोकमान्य टिळक ते गोरखपूर स्टेशन

Holi special Train
Mumbai-Jalna-Mumbai Jan Shatabdi Express : परभणीकरांना मुंबईसाठी मिळाली सहावी दैनंदिन रेल्वे,जनशताब्दीचा पूर्णा, वसमतला थांबा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com