Gondia Crime News: धक्कादायक.. मुलाच्या उपचारासाठी केली पैश्याची मदत; मोबदला म्हणून विवाहितेवर अत्याचार

Gondia News धक्कादायक.. मुलाच्या उपचारासाठी केली पैश्याची मदत; मोबदला म्हणून विवाहितेवर अत्याचार
Gondia Crime News
Gondia Crime NewsSaam tv

शुभम देशमुख 

गोंदिया : मुलाच्या उपचारासाठी पैश्याची मदत केली. याचा दबाव टाकत मदत केल्याचा मोबदला म्हणून (Gondia) महिलेवर दबाव टाकून दोघांनी अत्याचार केला. या दोन आरोपीना आरोपीला तर शरीर सुखाची मागणी करणाऱ्या एका आरोपीला रावणवाडी (Police) पोलिसांनी अटक केली आहे. (Tajya Batmya)

Gondia Crime News
Parbhani News: अल्पभूधारक शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; कर्ज फेडीची होती चिंता

गोंदिया जिल्ह्याच्या रावनवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील एका ४२ वर्षांच्या महिलेवर गावातील दोन प्रतिष्ठित व्यक्तींने दवाब टाकून आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात रावणवाडी पोलिसांनी २ नराधमांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर तिसऱ्या आरोपीने शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा (Crime News) दाखल करत त्यालाही पोलिसांनी अटक केले आहे. 

Gondia Crime News
Gulabrao Patil Statement: म्हणून आम्ही खोक्यांच्या आरोपातून मुक्त झालो; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची जोरदार फटकेबाजी

आरोपी नराधमाने पीडितेच्या मुलाच्या उपचारांसाठी सप्टेंबर २०२१ मध्ये गावातीलच ४२ वर्षांच्या पीडित महिलेला आर्थिक मदत केली. त्याचा मोबदल्यात म्हणून दोन्ही आरोपी तिच्यावर नेहमीच आळीपाळीने अत्याचार करायचे. यात देवेंद्र मानकर (वय ५०), राजू मानकर (वय ४२) यांचा समावेश आहे. हे दोन आरोपी कधी शेतात तर कधी घरी तिला फोन करून बोलावून तिच्यावर अत्याचार करायचे. तिने टाळण्याचे प्रयत्न केल्यास तिला धमकी द्यायचे. त्यातच आरोपीने ९ ऑगस्ट २०२३ ला पीडितेला रात्री शेतातील उसाच्या वाडीत नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. हा सर्व प्रकार नेहमी पाहणारा सहकारी ५० वर्षीय आरोपी अशोक मराठे यानेही पीडितेला फोन करून शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर पिडीत महिलेने ही बाब आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगितले असता पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपीवर रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com