Gulabrao Patil Statement: म्हणून आम्ही खोक्यांच्या आरोपातून मुक्त झालो; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची जोरदार फटकेबाजी

Nandurbar News म्हणून आम्ही खोक्यांच्या आरोपातून मुक्त झालो; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची जोरदार फटकेबाजी
Gulabrao Patil
Gulabrao PatilSaam tv

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : शिवसेनेतून बाहेर पडत आम्ही बीजेपीसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. तेंव्हा ५० खोके असा आरोप आमच्यावर होत राहिले. परंतु (Sharad Pawar) शरद पवार, अजित पवार यांच्या भेटीच्या इलू इलू तर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने आमच्यावर झालेल्या खोक्यांचे आरोपांपासून (Nandurbar) आम्ही मुक्त झालो असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी नंदुरबार येथे झालेल्या सभेत मांडले.  (Live Marathi News)

Gulabrao Patil
Online Fraud: सावधान..ॲमेझॉनवरून ग्राहकाची फसवणूक; ऑर्डर केला मोबाईल मिळाले कपडे धुण्याचे २ साबण

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुल आणि यासह विविध संस्थांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात झालेल्या मेळाव्यात मंत्री पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. 

Gulabrao Patil
Parbhani News: अल्पभूधारक शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; कर्ज फेडीची होती चिंता

अनेकांचे कोट टांगून ठेवले

दुसरीकडे राज्यात अलीकडे झालेला शपथविधी हा सकाळ, संध्याकाळ, दुपार तिघी वेळ पूर्ण झाल्याचा टोला मारत त्यांनी (Ajit Pawar) राजकीय भाष्य केले. याच वेळेस त्यांनी मी पहिल्यांदा मंत्री झालो त्यावेळेस कोट शिवला नव्हता. मात्र आता अनेकांचे कोट टांगून ठेवले असल्याचा टोला मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांना मारला आहे. एकूणच आज झालेल्या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीमुळे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com