
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गणेशोत्सवातसुद्धा सोनं-चांदीला चकाकी कायम आहे. सोनं-चांदीच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळवाच्या सराफा बाजारामध्ये सोनं-चांदीचे दर वाढले आहेत. सोन्याच्या दरात ११०० रुपयांनी वाढ झाली असून चांदीच्या दरात देखील ३ हजार रुपयांनी वाढ झाली आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि सोनं-चांदी खरेदी करणारे नाराज झाले आहेत. सोनं-चांदी खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या सुवर्णबाजारात सोनं- चांदीचे भाव दर दिवसाआड वाढताना दिसत आहेत. सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम १ हजार १०० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये प्रतिकिलोमागे ३००० रुपयांनी वाढ झाली आहे. सोनं- चांदीतील या उच्चाकांने गुंतवणूकदार हैराण झाले आहेत. ससतच्या दर वाढीमुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्राहक येत नसल्यामुळे ज्वेलर्स देखील चिंतेत आले आहेत.
अमेरिकेने आयात शुल्कात वाढ जाहीर केल्यानंतर सोनं आणि चांदीच्या बाजारपेठेत सातत्याने मोठी वाढ होत आहे. या निर्णयामुळे गुंतवणुकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ग्राहक सोनं-चांदीकडे वळतात. सोनं-चांदीमध्ये मोठी गुंतवणूक केली जाते. पण सततच्या दरवाढीमुळे त्यांनी देखील बाजाराकडे पाठ फिरवली आहे.
सोनं-चांदी या धातूंच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहेत. शनिवारी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ३ हजार ५०० रुपये विना जीएसटी होता. सोमवारी त्यात ११०० रुपयांची वाढ होऊन सोनं १ लाख ४ हजार ६०० रुपये विना जीएसटी झाले आहे. चांदीचे दर शनिवारी १ लाख २१ हजार प्रतिकिलो विना जीएसटी भाव होता. सोमवारी चांदी १ लाख २४ हजारांवर पोहोचली. जीएसटीसह सोन १ लाख ९ हजारांवर पोहचले आहे. तर चांदी जीएसटीसह १ लाख २७ हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे.
सोने (प्रति १० ग्रॅम) (विना जीएसटी)
- २६ ऑगस्ट - १ लाख ८०० रुपये
- २८ ऑगस्ट - १ लाख १७ हजार ५०० रुपये
- २९ ऑगस्ट - १ लाख २ हजार रुपये
- ३० ऑगस्ट - १ लाख १८ हजार रुपये
- १ सप्टेंबर - १ लाख ४ हजार ६०० रुपये
- २ सप्टेंबर - १ लाख ५ हजार ६०० रुपये
- ३ सप्टेंबर - १ लाख १० हजार रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.