

सोनं-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण
सलग दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीचे दर घसरले
आठवडाभरात सोनं ७००० रुपयांनी स्वस्त झालं
तर १ किलो चांदी १४००० रुपयांनी स्वस्त झाली
जळगावच्या सराफा बाजारात आठवड्याभरात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आठवडाभरामध्ये सोनं ७००० रुपयांनी स्वस्त झालं. तर चांदी १४००० रुपयांची स्वस्त झाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५१ हजार रुपये तर चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ३३ हजार रुपये प्रति किलोवर आले आहेत. सोनं-चांदीचे दर घसरल्यामुले ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.
जळगावच्या बाजारात सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरन झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, अमेरिकेतील व्याजदरवाढीची शक्यता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे सोनं-चांदीचे दर कमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. आठवड्याभरामध्ये सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सध्या सोनं-चांदी दर जरी घसरले असले तरी देखील आगामी काळात सोनं- चांदीच्या दरात मोठी भाव वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत पितृपक्ष सुरु होत नाही तेवढ्यातच सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं आणि चांदीचे दर अचानक घसरले. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सोन्याच्या दरवाढीलासध्या ब्रेक लागला. आज सराफा बाजारात १ तोळा सोनं १००० रुपयांनी स्वस्त झालं. तर आज चांदीच्या दरात काहीच बदल झाला नाही.
२२ कॅरेटचे १ तोळा सोनं - १,३५,५७० रुपये
२४ कॅरेटचे १ तोळा सोनं - १,४८,००० रुपये
१ किलो चांदी- २,२५,००० रुपये
२२ कॅरेटचे १ तोळा सोनं - १,३४,६५० रुपये
२४ कॅरेटचे १ तोळा सोनं - १,४७,००० रुपये
१ किलो चांदी- २,२५,००० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.