Gold Rate: युद्धविरामानंतर सोनं महागलं, सोन्याच्या दरात ३००० रुपयांनी वाढ; सुवर्णनगरीत आजचे दर किती?

Gold- Silver Rate Today: जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिका-इराणमधील युद्धविरामानंतर सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आजचे सोनं-चांदीचे दर किती ते वाचा...
Gold Rate: युद्धविरामानंतर सोनं महागलं, सोन्याच्या दरात ३०००० रुपयांनी वाढ; सुवर्णनगरीत आजचे दर किती?
Gold Rate TodaySaam Tv
Published On

Summary -

  • युद्धविरामानंतर सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ

  • २४ कॅरेटचे १ तोळा सोन्याचे दर ३००० रुपयांनी वाढले

  • १ किलो चांदीच्या दरात १०,००० ची वाढ

  • ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर

संजय महाजन, जळगाव

इराण-अमेरिकामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या युद्धाला अखेर युद्धविराम मिळालं आहे. युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात मोठ्या घडामोडी घडण्यास सुरूवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सोनं-चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. सोनं-चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ३००० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये १०००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेटचे सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५६ हजार ४५ रुपयांवर पोहचला आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ५४ हजार ४१० रुपयांवर गेला आहे. सोनं आणि चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com