जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण
चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली
२४ कॅरेट १० तोळे सोनं तब्बल १५,००० रुपयांनी स्वस्त झाले
१ किलो चांदीच्या दर २,००० रुपयांनी स्वस्त झाले
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. जळगावचा सराफा बाजार उघडताच आज सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल दिसून आला. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १५०० रुपयांची घसरण झाली. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये २००० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे आज सुवर्णनगरीत सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. दर कमी झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. विशेषतः सोने अडीच महिन्यांच्या कालखंडानंतर दीड लाखांच्या खाली आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. चांदीही आता अडीच लाखांच्या खाली आली आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर होताना दिसत आहे.
आज जळगावच्या सराफा बाजारात २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १५०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी १ लाख ४६ हजार रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १५००० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी १४ लाख ६० हजार रुपये खर्च करावे लागतील. तर आज १ किलो चांदीच्या दरामध्ये २००० रुपयांची घसरण झाली असून चांदीचे दर अडीच लाखांच्या खाली आली आहे.
देशभरातील सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहेत. मात्र, सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये गेल्या दोन दिवसांत लक्षणीय घसरण झाल्याने ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष बाजाराकडे वेधले गेले आहे. २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदविण्यात आली असून चांदीच्या किमतींनाही फटका बसला आहे.
काही आठवड्यांपूर्वी विक्रमी पातळी गाठणाऱ्या सोन्याने आता बऱ्यापैकी खाली आल्याचे चित्र आहे. त्यामुळे अधिक मास, सणासुदीची खरेदी आणि गुंतवणुकीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, या घसरणीमागे अनेक आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.