Gold Price Today: सोन्याच्या दरात आज मोठा बदल, स्वस्त झालं की महागलं? वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Gold -Silver Rate Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. आज सोनं-चांदी स्वस्त झाली. खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर...
Gold Price Today: सोन्याच्या दरात आज मोठा बदल, स्वस्त झालं की महागलं? वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर
Gold Rate TodaySaam Tv
Published On
  • जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीच्यादरात मोठा बदल

  • आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली

  • १ तोळा सोन्याचा विना जीएसटी दर १,४५,५०० वर पोहचले

  • चांदीच्या दरात ५,००० रुपयांची घसरण झाली

संजय महाजन, जळगाव

जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्‍या दरामध्ये सातत्‍याने चढ-उतार सुरू आहे. या आठवड्याच्‍या सुरवातीला सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. पण त्यानंतर सोन्याच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर वाढले असले तरी देखील चांदी मात्र स्वस्त झाली आहे. चांदीच्या दरात ५००० रुपयांची घसरण झाली आहे.

लग्‍नसराई आटोपली असल्‍याने सोने आणि चांदीच्‍या दागिन्‍यांना मागणी कमी झाली आहे. या व्यतिरिक्त आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत होत असलेल्या बदलामुळे देखील सोने-चांदीच्‍या दरामध्ये सातत्‍याने चढ-उतार होत आहेत. गेल्‍या आठवड्यापासून दरात चढ-उतार होत झाली असून या आठवड्याच्‍या पहिल्‍याच दिवशी सोमवारी सोनं -चांदीचे दर स्‍थिर होते. यानंतर दर कमी झाले आहेत. आज देखील चांदीचे दर खाली आले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून सोनं- चांदीच्‍या भावात चढ- उतार पहायला मिळाली. यात सोनं २ दिवसांमध्‍ये २५०० रूपयांनी महाग झाले आहे. मंगळवारी १ तोळा सोनं विना जीएसटी १ लाख ४३ हजार रुपयांवर होते. त्यात बुधवारी २००० वाढ होऊन १ लाख ४५ हजार रुपये झाले. तर आज ५०० रूपयांची वाढ होवून दर १ लाख ४५ हजार ५०० रूपयांवर गेले आहेत. तर चांदीचे दर बुधवारी २ लाख ३० हजारांवर होते. यात ५००० रूपयांची घसरण होवून चांदी प्रतिकिलो विनाजीएसटी २ लाख २५ हजार रूपयांवर आली आहे.

आठवडाभरातील सोन्याचे प्रतिदहा ग्रॅमचे विनाजीएसटी दर -

२० जुलै - १ लाख ४१ हजार ६०० रुपये

२० जुलै - १ लाख ४१ हजार ८०० रुपये

२१ जुलै - १ लाख ४३ हजार रुपये

२२ जुलै - १ लाख ४३ हजार रुपये

२३ जुलै - १ लाख ४३ हजार रुपये

आठवडाभरातील चांदी प्रति किलोचे विनाजीएसटी दर -

२० जुलै - २ लाख २० हजार रुपये

२० जुलै - २ लाख २४ हजार रुपये

२१ जुलै - २ लाख २५ हजार रुपये

२२ जुलै- २ लाख ३० हजार रुपये

२३ जुलै - २ लाख २५ हजार रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com