राजेंद्र पुंडलिक झाडे हे त्यांच्या कुटुंबीयांसह राळेगावला जाण्यासाठी बसस्थानाकात आले. राळेगाव येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना त्यांच्या पत्नीने पर्स एका सीटवर ठेवली. काही वेळात त्या पर्सची चैन अर्धवट उघडी दिसली. (Maharashtra News)
पर्समधून एक लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची बाब लक्षात आली. या घटनेने बसमधील प्रवाशांमध्येही खळबळ उडाली. तत्काळ प्रवाशांसह बस अवधूतवाडी पोलिस ठाण्यात नेण्यात आली. मात्र, चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. याप्रकरणी राजेंद्र झाडे यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Breaking Marathi News)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.