गोकुळच्या आखाड्यात मंत्री पुत्राला धोबीपछाड; कोण ठरला जायंट किलर?

Hasan Mushrif Son Navid Mushrif Election Defeat: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनलने मोठा विजय मिळवला. मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ यांना पराभवाचा धक्का बसला.
Gokul Milk Union election result 2026 in Kolhapur
Gokul Milk Union election result 2026 in Kolhapursaam tv
Published On: 

रणजित माजगांवकर, साम टीव्ही

कोल्हापूर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी महायुतीच्या विरोधात एकट्याने लढत मोठी बाजी मारली. या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील पाटलांनी चांगलाच दणका दिला आहे. त्यांचे चिरंजीव आणि गोकुळचे विद्यमान अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे.

महायुतीच्या पॅनलचे नेतृत्व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे होते. त्यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ गोकुळचे चेअरमन होते. त्यांना देखील परभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत अंधश्रद्धेला देखील खत पाणी घालण्याचे काम नेत्यांकडून दिसून आले. मुश्रीफ यांनी आई यल्लमाची भीती घालत मतदारांना मत द्यायला भाग पडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुश्रीफ यांच्या अंधश्रद्धेला दूध उत्पादकांनी कात्रजचा घाट दाखवला आहे.

सर्व ठरावधारकांना यल्लमा देवीच्या डोंगराकडे नेताना त्यांना परडी भंडाऱ्यावर हात मारून देवीचा कोप येईल अशी भीती देखील घालण्यात आली होती. जर बाळूमामाची शपथ मोडली, तर ब्रेनस्ट्रोक येतो अशीही भीती माजी आमदार के.पी. पाटील यांनी दिली होती. या सगळ्याला मतदारांनी स्पष्ट नाकारल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदाच्या झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत दिग्गजांना पराभव पत्कारावा लागला, तर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी या सगळ्यांना धोबीपछाड देत एकहाती सत्ता काबिज केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com