गोकुळ दूध संस्थेची निवडणूक राज्यात चर्चेत आली आहे. गोकुळचा खासगीकरणाचा मुद्दा, जिल्ह्यातील संस्था अपात्र प्रकरण आणि अगदी शेवटपर्यंत महायुतीमधील धुसफूस यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. राज्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी ठरतेय का ? अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादी मंत्री आणि गोकुळमध्ये सत्तेचा अनूभव असणारे हसन मुश्रीफ यांनी ठरावधारकांना यल्लमा देवीची शपथ देतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंंतर आता आणखी एक नवा वाद निर्माण झालाय. गोकुळ निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी महायुतीच्या नेत्यांनी आदमापूर येथील बाळूमामा मंदिर परिसरात ठरावधारकांना एकत्र करत शपथविधीचा घाट घातला. या प्रचाराच्या निमित्तानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी ठरावधारकांसमोर धक्कादायक विधान केलंय.
मंत्री मुश्रीफांनंतर आता माजी आमदार केपी पाटलांकडून ठरावधारकांना आपल्या बाजूनं वळवताना भीती दाखवण्यासाठी अकलेचे तारे तोडलेत. गोकुळ दूध संस्थेसाठी रविवारी मतदान झालं. मात्र महायुतीच्या नेत्यांनी ठरावधारकांना दिलेली शपथ आणि दम यामुळे कोल्हापूरात मोठी खळबळ उडालीये. यावरुन राजकारण चांगलंच तापलंय. काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांनी सडकून टीका केलीये. तर महायुतीच्या नेत्यांकडून मात्र सारवासारव करण्यात आलीये.
खरंतर, 4 हजार कोटींहून अधिकच्या उलाढाली असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत थेट देवीदेवतांची भिती दाखवून मतदारांना आपल्या बाजून वळवण्यासाठी केवीलवाणी धडपडत पहायला मिळाली. मतांचं गणित जुळवण्यासाठी नेत्यांना आता राजकीय मुद्द्यांपेक्षा थेट देवी-देवतांच्या शपथांचा आधार घ्यावा लागतोय. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात मतदारांना देवी-देवतांची भीती दाखवून नेते कुठला पायंडा पाडू इच्छितात, हाच खरा सवाल आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.