VIDEO: 'ब्राह्मण, मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या' मनोज जरांगेंच्या मागणीनं नवा वाद पेटणार?

Manoj Jarange Patil: गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा वाद पेटलाय. अशातच मनोज जरांगेंनी आता ब्राह्मण आणि मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत अशांना ओबीसीतून आरक्षण मिळायला हवं असं जरांगेंनी म्हंटलंय.
'ब्राह्मण, मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या' मनोज जरांगेंच्या मागणीनं नवा वाद पेटणार?
Manoj Jarange PatilSaam Tv
Published On

आरक्षणावरून राज्याचं राजकारण तापलंय. सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंनी सरकारला 13 जूनपर्यंत अल्टिमेटम दिलंय. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको या मुद्यावर ओबीसी समाज आक्रमक झालाय. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंनी वडीगोद्रीत 10 दिवस उपोषण करत कडाडून विरोध केलाय. या वादात आता आणखी एका मुद्याची भर पडण्याची शक्यता आहे.

कारण मनोज जरांगेंनी मराठा समाजानंतर ब्राह्मण आणि मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केलीय. मुस्लिम समाजाच्याही कुणबी नोंदी आढळल्यात, असा दावा मनोज जरांगेंनी केलाय. जरांगेच्या नव्या मागणीवरून ओबीसी नेते पुन्हा एकदा खवळले आहेत. आरक्षण म्हणजे खिरापत नाही, असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी जरागेंवर निशाणा साधलाय.

'ब्राह्मण, मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या' मनोज जरांगेंच्या मागणीनं नवा वाद पेटणार?
Maharashtra Rain Video: राज्यात पुढील 4 दिवस जोर'धार'! पुणे, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

देशात मुस्लिमांना कुठे कुठे आरक्षण?

36 मुस्लीम जातींचा ओबीसीत समावेश.

केरळमध्ये मुस्लिमांना नोकरीत 8% आणि उच्च शिक्षणात 10% आरक्षण आरक्षण मिळते.

तामिळनाडूत मागासवर्गीय मुस्लिमांना 3.5% आरक्षण.

बिहारमध्येही काही मुस्लीम जातींचा ओबीसीत समावेश.

कर्नाटकात सर्व मुस्लिमांना ओबीसीतून 4 % आरक्षण.

'ब्राह्मण, मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या' मनोज जरांगेंच्या मागणीनं नवा वाद पेटणार?
Teacher Pension Video: मोठी बातमी! 2005 नंतरच्या शिक्षकांना मिळणार पेन्शन, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, या मागणीवरून ओबीसी समाज आक्रमक झालाय. मात्र मनोज जरांगे ओबीसीच्या आरक्षणावर ठाम आहेत. त्यात आता ब्राह्मण आणि मुस्लिम आरक्षणाच्या मुद्याची भरही पडण्याची शक्यता आहे. यावरून आरक्षणाचा वाद आणखीनच चिघळणार हे स्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com