viral speech
viral speechtwitter

Viral Video: चिमुकलीचं प्रजासत्ताक दिनाचं जबरदस्त भाषण व्हायरल; VIDEO पाहून तुम्हीही टाळ्या वाजवाल!

Republic Day Speech: प्रजासत्ताक दिन म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर येतं ते भाषण. दोन दिवसांपूर्वी प्रजासत्ताक दिन पार पडलाय. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.
Published on

Republic Day Speech Viral Video

प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन आला की, आपल्याला भाषणाची उत्सुकता लागते. लहानपणी जवळपास प्रत्येकानेच भाषण (Republic Day Speech) केलेलं असावं. खरं तर सगळ्यांसमोर भाषण करणं हे एक मोठं आव्हानच असतं. अनेकजण ते सकारात्मकतेनं पार पाडतात. तर अनेकांची धांदल उडते. पण, प्रत्येकजण आपापल्या परीनं छान प्रयत्न करत असतो.  (Latest News)

व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल

प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) शाळा आणि कॉलेजांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातात. अशा परिस्थितीत साधे आणि छोटे भाषण तयार करणं, हे फार कठीण काम आहे. टाळ्यांचा गडगडाट व्हावा असा सर्वांना वाटतं. असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चिमुकलीचं भाषण व्हायरल

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक चिमुकली जबरदस्त भाषण करत आहे. तिच्या या भाषणाला टाळ्यांचा गडगडाट होतोय. प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळत आहे. हा (Republic Day speech) व्हिडिओ पाहिल्यावर अगदी आपल्यालाही या चिमुकलीचं कौतुक करण्याचा मोह आवरता येत नाही.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

हा व्हिडिओ समर्थ विद्या मंदिर बुजगाव पूर्व, उंचगाव पूर्व कोल्हापुर येथील असल्याची माहिती मिळतेय. सिद्धी प्रवीण मोरे या चिमुकलीच्या भाषणाचा हा व्हिडिओ (Republic Day Speech Viral Video) आहे. २ मिनिटं आणि ११ सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. भाषणात सुरूवातीला तिनं अगदी गोड आवाजात सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधान या सगळ्यांवर छान भाषण केलंय. तिचा हा व्हिडिओ (Speech Viral Video) सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. युवकांना प्रेरित करीत जय हिंद बोलून तिने आपल्या भाषणाचा शेवट केला आहे. या व्हिडिओला चांगलं लाईक्स मिळत आहे. तिचा व्हिडिओ बघून काही क्षणांसाठी आपणही भाषण करावं, अशी तुमची इच्छा होईल.

viral speech
Viral Video: पोलीस ठाण्यात बिबट्याची एन्ट्री; कुत्र्याला फाडलं, थरारक व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com