Girish Mahajan : महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंधांचे घणाघाती आरोप, गिरीश महाजन भडकले; खडसेंविरोधात कठोर पाऊल

Girish Mahajan and Eknath Khadse War : गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आगामी काळात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
Girish Mahajan sends defamation notice to Eknath Khadse
Girish Mahajan sends defamation notice to Eknath KhadseSaam Tv News
Published On

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव : महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांच्यावर IAS महिला अधिकाऱ्यांसोबत संबंध असल्याचा घणाघाती आरोप करत निशाणा साधला होता. यानंतर गिरीश महाजन यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देताना 'आपल्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती आहे. त्यामुळे आपण त्या पातळीवर जाऊन बोलणार नाही', असं गिरीश महाजन म्हणाले होते. यानंतर आता गिरीश महाजन यांनी खडसेंच्या आरोपांप्रकरणी कठोर पाऊल उचललं आहे.

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आगामी काळात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. खडसे आणि महाजन यांनी एकेकाळी एकाच पक्षात राहून सोबत काम केलं आहे. पण आता दोन्ही नेते एकमेकांवर अतिशय टोकाची टीका-टीप्पणी करताना दिसतात. खडसे यांनी गिरीश महाजन यांचे IAS महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप कोणत्या आधारावर केला ते देखील नंतर स्पष्ट केलं होतं. एका पत्रकाराने केलेल्या आरोपांवरुनच आपण संबंधित आरोप केल्याचं खडसेंनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे महाजनांनी संबंधित पत्रकाराला देखील अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे.

Girish Mahajan sends defamation notice to Eknath Khadse
PM Modi - Congress : 'हे बाबासाहेबांचे शत्रू'; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसचं प्रत्युत्तर

दरम्यान, गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि संबंधित पत्रकाराला नोटीस बजावल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'कुणीही यावं आणि काहीही आरोप करावे हे मला मान्य नाही. अशा प्रकारच्या आरोपांमुळे जनमाणसात आपली प्रतिमा मलिन होते. त्यामुले मी माझ्या मुंबईतील वकिलांच्या माध्यमातून संबंधितांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. त्यांना ही नोटीस मिळाली असेल. यापुढे मी त्यांच्याशी कोर्टातच लढणार', अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी एका वृत्त वाहिनीला दिली आहे.

Girish Mahajan sends defamation notice to Eknath Khadse
Praniti Shinde: राक्षसाला जसं रक्त पाहिजे असतं तसं भाजपला... प्रणिती शिंदेंची जहरी टीका|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com