Gondia Crime News : चहा पिताना मित्रांची चेष्टा मस्करी...गैरसमजुतीतून युवकावर चाकू हल्ला, तिघे अटकेत

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली हाेती.
Gondia, gangazari police
Gondia, gangazari policesaam tv
Published On

- शुभम देशमुख

Gondia News : चेष्टा करताना दिलेली शिवीगाळ ही शेजारच्या व्यक्तीने आपल्याला दिली असे वाटले,त्यातून झालेल्या वादात एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना शहारवानी येथे घडली. विशाल ताराम (२५, राहणार लेंडझरी) असे गंभीर जखमी असलेल्या तरुणाचे नाव आहे. (Maharashtra News)

Gondia, gangazari police
NCP vs NCP : 'अजित पवारांना राष्ट्रवादीचं चिन्ह, पक्षाचं नाव मिळण्यात काहीच अडचण वाटत नाही'

गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत (gangazari police) येणाऱ्या शहारवानी येथील सोयब पुराम (३१) व विशाल ताराम (२५) हे दोघे जण शहारवानी येथील ग्रामपंचायत कार्यालया शेजारी एका चहाच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले होते. यावेळी विशाल ताराम याचे दोन ते तीन मित्र त्या ठिकाणी आले. (gondia news)

Gondia, gangazari police
Solapur News : 'त्या' प्रकरणात भाजप खासदार डाॅ. जयसिद्धेश्वरांना उच्च न्यायालयातून दिलासा

विशाल ताराम त्यांच्यासोबत चेष्टा मस्करी करून ते एकमेकाला शिवीगाळ करू लागले. त्यावेळी बाजूच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानात उभा असलेला संशयित आरोपी सूरज मेश्राम (२८) याला शिवीगाळ त्याला करीत आहे असे वाटले.

त्यावर सूरज मेश्राम व विशाल ताराम यांच्यात वाद झाला. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करून थापड बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सूरज मेश्राम तेथून निघून गेला. काही वेळातच त्याचे वडील चुनीलाल मेश्राम व भाऊ अमर मेश्राम यांच्यासोबत परत आला.

Gondia, gangazari police
Saam Impact : चिमुकल्या गणेश माळीच्या संघर्षाची कहाणी पाहून डाेळे पाणावले, जिद्दीला मुख्यमंत्र्यांकडून सलाम

त्यावेळी चुनीलाल मेश्राम यांनी सोयब पुराम यांना काठीने मारण्याचा प्रयत्न केला. अमर मेश्राम यानेही सोयब यांना चाकूने मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरून सोयब त्या ठिकाणाहून पळून गेला. त्याने गंगाझरी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली. या तक्रारीनूसार पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com