नागपूर : शहरामधील बदनाम वस्ती गंगाजमुनात Gangajamuna काही दिवसांपासून अवैध धंदे, गांजा- ड्रग्सच्या drugs विक्रीसह गुंडांचा वावर याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला होता. यामुळे त्याठिकाणी मोठे कांड होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिस Police आयुक्तांनी बुधवारपासून गंगाजमुना परिसर पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. गंगाजमुनात भागातमध्ये २०० पोलिसांचा ताफा त्याठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
येथील सर्व रस्त्यावर बॅरिकेड्स Barricades लावण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. गंगाजमुनात कोरोना Corona नियमांचे पूर्णतः उल्लंघन होत आहे. या भागात गुन्हेगारांचा वावर हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. काही दलाल अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
हे देखील पहा-
याशिवाय परिसरामधील नगरसेवक Corporator आणि प्रतिष्ठित नागरिकांनीही गंगाजमनामुळे होणाऱ्या त्रासाबाबत पोलिस आयुक्तांकडे अनेकवेळा तक्रार करण्यात आली आहे. याची दखल घेत पोलिस आयुक्तांनी Commissioner बुधवारी रात्री कायद्यानुसार गंगाजमुना भाग हे सील Seal करून, या भागात संचारबंदी Curfew लागू करण्याचा निर्णय घेतले आहे. याबाबत अधिसूचना देखील काढण्यात आली आहे. यासह लकडगंज Lakdaganj पोलिसांसह ५ अधिकारी आणि १०० पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रचंड मोठा ताफा या भागामध्ये तैनात करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री पोलिसांनी गंगाजमुनाची झाडाझडती करण्यास सुरूवात केलेली होती. बाहेरून आलेल्या, व्यक्तींची याठिकाणी धरपकडला सुरूवात करण्यात आली आहे, त्यांच्यावर पोलिस ठाण्यात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गंगाजमुना परिसरामध्ये देशीदारू, बिअर शॉपी, वाईनं शॉप याबरोबर बिअर बार देखील त्याठिकाणी आहेत. या सर्वांचे परवाने रद्द करण्याचे पत्र आयुक्तांनी उत्पादन शुल्क विभागाला पाठविन्यात आले आहे.
आता उत्पादन शुल्क विभाग आयुक्तांच्या पत्रावर काय कारवाई करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच याठिकाणी पानठेल्यावर ड्रग्स- गांजाविक्री होत असते, त्याचीही माहिती पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचली आहे. गंगाजमुना मधील घरांमध्ये देहव्यापारासाठी अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले आहे. हे बांधकाम तोडण्याची विनंती सीपी अमितेश कुमार यांनी महापौर तिवारी यांना यावेळी केली आहे. नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांनी आयुक्तांना दिले आहेत. सध्यस्थितीत गंगाजमनात सुमारे ६०० वारांगना असल्याची माहिती मिळालेली आहे. लवकरच मनपाचा बुलडोजरही याठिकाणी चालवला जाणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.