Aurangabad Crime: हवेत गोळीबार, कोयत्याचा धाक दाखवून लूट; संभाजीनगरात भररस्त्यावर गुंडांचा हैदोस

Gang opens fire in Aurangabad: हवेत गोळीबार करून, कोयत्यांचा धाक दाखवून टोळीने एका व्यक्तीकडून १० हजार लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
Aurangabad
AurangabadSaam
Published On

हवेत गोळीबार करून, कोयत्यांचा धाक दाखवून टोळीने एका व्यक्तीकडून १० हजार लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपींवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत एकही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली असून, यानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

छत्रपती संभाजीनगर शहरात अवैध व्यावसायिक आणि गुन्हेगारांच्या टोळीमध्ये वाढ झाली आहे. टोळीकडून हप्तेखोरी आणि खंडणीवरून रविवारी रात्री मोठा तणाव निर्माण झाला होता.छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीच्या झेंडा चौकात एकाला धमकावून त्याच्याकडून पैसे लुटल्याची घटना घडली आहे.

Aurangabad
Traffic Rules: कोणता वाहतूक नियम मोडला तर किती फाइन बसेल? वाचा

विकी हेल्मेट, मुकेश साळवे, किशोर शिंदे आणि उमेश गवळी अशी आरोपींची नावे आहेत. विकी हेल्मेट, मुकेश साळवे कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. २३ मार्च रोजी रात्री सुनील डुकले त्यांचा मुलगा आणि भाचा इच्छामणी हॉटेलजवळ पत्ते खेळत बसले होते. दरम्यान चारही आरोपी त्या ठिकाणी पोहोचले.

Aurangabad
Ulhasnagar: कुटुंबात रक्तरंजित राडा; शिवसेना शाखेसमोरच मेव्हण्याकडून दाजीवर धारदार शस्त्राने हल्ला, थरकाप उडवणारा VIDEO

आरोपींनी त्यांच्यावर कोयते, दांडके आणि इतर धारदार शस्त्रांद्वारे हल्ला केला. हवेत गोळीबार करून त्यांच्याजवळील पैसे हिसकावले. या टोळीने भंगाराच्या दुकानातून १० हजार रुपये लुटल्याची माहिती आहे. पैसे घेऊन ते पसार झाले. या घटनेनंतर पीडित व्यक्तींनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार दाखल करूनही पोलिसांनी कारवाई केलेली नाही. घटनेनंतर आरोपी परिसरातच शस्त्रांसह फिरत असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com