Ulhasnagar: कुटुंबात रक्तरंजित राडा; शिवसेना शाखेसमोरच मेव्हण्याकडून दाजीवर धारदार शस्त्राने हल्ला, थरकाप उडवणारा VIDEO

Ulhasnagar Domestic dispute turns violent: शिवसेना शाखेबाहेर कौटुंबिक वादातून सासरा आणि मेव्हण्याने जावयाला बेदम मारहाण केली आहे. यात जावई गंभीर झाला आहे. ही धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली आहे.
Ulhasnagar
UlhasnagarSaam
Published On

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेबाहेर कौटुंबिक वादातून सासरा आणि मेव्हण्याने जावयाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत जावई गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून, अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. पोलिसांकडून आरोरपींचा शोध सुरू आहे.

उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्या दाम्पत्याने एकमेकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सासरच्या मंडळींनी केलेल्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला आहे. वैभव देवधर असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Ulhasnagar
Kunal Kamra: 'परिवारवाद खत्म करना था, बाप चुरा लिया', एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवणारा कुणाल कामरा कोण?

वैभव देवधर आणि प्राची हे पती-पत्नी आहेत. मात्र, कौटुंबिक वादामुळे ते विभक्त राहतात. कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी त्यांनी उल्हासनगरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांची मदत घेतली. त्यांना शाखेत बोलावलं होतं. मात्र यावेळी पती-पत्नीत वाद होऊन शिवसेनेच्या शाखेबाहेरच हाणामारी झाली.

Ulhasnagar
Kunal Kamra On CM: 'जैसे संसद में हो एक जहरीला सांप..'कुणाल कामरानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही रचलं गाणं.. VIDEO व्हायरल

तुफान हाणामारीत प्राचीच्या भावाने बहिणीच्या पतीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. या घटनेत प्राचीचा पती वैभव हा गंभीर जखमी झाला. मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मारहाणीनंतर पोलिसांनी धाव घेतली. वैभवला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com