Traffic Rules: कोणता वाहतूक नियम मोडला तर किती फाइन बसेल? वाचा

Bhagyashree Kamble

दंडाची रक्कम

वाहतुकीचे नियम मोडाल तर आता मोठा फटका बसेल. कारण दंडाची रक्कम १० पटीनं वाढवण्यात आली आहे. कोणता नियम मोडला तर, किती फाइन आकारला जाईल हे जाणून घ्या.

money | google

विनाहेल्मेट

विनाहेल्मेट दुचाकी चालवलीत, तर हजार रुपये दंड भरावा लागेल. यासोबतच, ड्रायव्हिंग लायसन्स देखील तीन महिन्यांसाठी रद्द केले जाईल.

helmet marathi word | saam tv

सीट बेल्ट

सीट बेल्ट न लावता कार चालवताना पकडल्यास हजार रुपये दंड आकारला जाईल.

सिग्नल

तसेच सिग्नल तोडलात तर, तुम्हाला ५०० रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड भरावा लागेल.

traffic signal

दंड

वाहन चालवत असताना फोनवर बोलताना पकडलं तर ५०० रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

Money | google

स्टंट

वेगानं वाहन चालवल्यास आणि स्टंट केला तर पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

traffic signal

अॅम्ब्युलन्स

अॅम्ब्युलन्सची वाट अडवली तर त्याला दहा हजार रुपये दंड भरावा लागेल.

Ambulance | Saam

ड्रायव्हिंग लायसन्स

जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर ५०० रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड भरावा लागेल.

Licence | Saam

इन्शुरन्स

तुम्ही इन्शुरन्सशिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला दोन हजार रुपये दंड किंवा तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Safe Driving Tips | Saam Tv

वय

ड्रायव्हरचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्याला वाहन चालवताना पकडले तर २५ हजार रुपये दंड आणि ३ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. त्या वाहनाची नोंदणी देखील एका वर्षासाठी रद्द केली जाईल. संबंधित व्यक्तीला वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही.

Safe Driving Tips | freepik.com

मद्यपान

मद्यपान करून गाडी चालवत असाल तर दहा हजार रुपये दंड किंवा ६ महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते. दुसऱ्यांदा असा गुन्हा केला तर आणि वाहतूक पोलिसांनी पकडलं तर, पंधरा हजारांपर्यंत दंड किंवा २ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

Avoid alcohol | yandex

Summer Meal : वाढत्या उन्हाळ्यात आठवड्यातून 2 वेळा करा 'या' पदार्थाची मेजवानी, पोटाला मिळेल आराम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा: