primary health care
primary health caresaam tv

Ganeshotsav 2023 : प्रसादाच्या सेवनानंतर 46 जणांना विषबाधा

सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले.
Published on

- संजय सूर्यवंशी

Nanded News : राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. सर्वत्र गणेश मंडळांचे कार्यकर्ते विविध उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत. दरम्यान महालक्ष्मी सणाच्या प्रसादाचे सेवन केल्यानंतर किनवट तालुक्यातील बेल्लोरी गावातील 46 जणांना विषबाधा झाल्याचे समाेर आले आहे. (Maharashtra News)

primary health care
Political News : महाजनांच्या हातपाय जोडण्याच्या टीकेवर एकनाथ खडसेंचे प्रत्युत्तर, सत्तेसाठी कोणाचीही...

सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळे देखील प्रसादाचे वाटप असाे अथवा विविध कार्यक्रम स्थानिक नागरिकांची मदत घेत कार्य पार पाडत आहेत. नांदेड जिल्ह्यात मागील दाेन दिवसापासून गौराई सणाचा उत्सव सुरू आहे. या सणा दरम्यान नांदेडमध्ये एक घटना समोर आली आहे.

primary health care
Nandurbar News : अंधश्रद्धेतून महिलेस ठरविले डाकीण, Saam TV समोर अंगावर शहारे आणणारा प्रसंग कुटुंबाने केला कथन

महालक्ष्मी अर्थात गौराई सणाच्या (ganeshotsav) प्रसादाचे सेवन केल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील बेल्लोरी गावातील 46 जणांना विषबाधा झाली. गौराई सणानिमित्त घरोघरी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या जेवणातून विषबाधेचा हा प्रकार घडला आहे.

या घटनेतील बाधितांवर किनवटच्या गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांत लहान थोरांसह बालकांचा देखील समावेश आहे. यातील सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

primary health care
Crime News : तिहेरी हत्याकांडाने नगर जिल्हा हादरला, पत्नी, मेहुण्यासह आजे सासूचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com