Hingoli : जंगली प्राण्यांपासून बचावासाठी शेतीच्या कुंपणात सोडला विद्युत प्रवाह, युवकाच्या जीवावर बेतला; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Hingoli Marathi News : शेतकऱ्यांनी प्राणी व मानवाला धोका होईल असे कृत्य करू नये असे आवाहन हिंगाेली पाेलिसांनी हिंगाेली जिल्ह्यातील शेतक-यांना केले आहे.
gajanan thombre youth from hingoli passed away
gajanan thombre youth from hingoli passed awaysaam tv
Published On

Hingoli News :

जंगली प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतातील लोखंडी कुंपणामध्ये सोडलेला विद्युत प्रवाह एका युवकाच्या जीवावर बेतल्याची घटना हिंगोली जिल्ह्यात घडली. विद्युत प्रवाहामुळे विजेचा शॉक बसून गजानन ठोंबरे (gajanan thombre youth from hingoli passed away) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. (Maharashtra News)

राज्यातील मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या दहा वर्षांपासून आणखी एका संकटाची भर पडली आहे ती म्हणजे जंगली प्राणी शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस करत असलेले संकट. पोटच्या लेकराप्रमाणे जोपासलेल्या पिकांचं जंगली प्राणी नुकसान करत असल्याने हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत.

gajanan thombre youth from hingoli passed away
Wardha NCP : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात गटबाजी, राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिवांसह सहका-यांवर गुन्हा दाखल

हिंगोली तालुक्यातील पेडगाव शेतशिवारात लोखंडी कुंपणाला विद्युत प्रवाह साेडण्यात आला. या विद्युत प्रवाहामुळे विजेचा शॉक बसून एक युवक जागीच ठार झाला. गजानन ठोंबरे असे मृत्यू झालेल्या 21 वर्षीय युवकाचे नाव आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ठोंबरे यांच्या मृत्यूप्रकरणी शेतातील कुंपणामध्ये विद्युत प्रवाह सोडणाऱ्या प्रकाश पडघन या शेतकऱ्याच्या विरोधात बासंबा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

gajanan thombre youth from hingoli passed away
Amravati Lok Sabha Constituency : ...तर मी राजकारणातून संन्यास घेईन : डाॅ. राजेंद्र गवई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com